राष्ट्रीय

मेघा इंजिनिअरिंग कंपनीविरोधात सीबीआयकडून गुन्हा दाखल; ७८ कोटी रुपयांची लाच दिल्याचे प्रकरण

सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले की, जगदलपूर येथील स्टील यंत्राशी संबंधित कामासाठी मेघा इंजिनिअरिंगच्या १७४ कोटी रुपये बिलाच्या मंजुरीसाठी ७८ लाख रुपयांची कथित लाच दिल्याचे हे प्रकरण आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : ९६६ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी करून देशात चर्चेत आलेल्या मेघा इंजिनिअरिंग ॲॅण्ड इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेडविरोधात सीबीआयने कथित भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे देशात मोठी खळबळ माजली आहे.

सीबीआय अधिकाऱ्यांनी सांगितले की, जगदलपूर येथील स्टील यंत्राशी संबंधित कामासाठी मेघा इंजिनिअरिंगच्या १७४ कोटी रुपये बिलाच्या मंजुरीसाठी ७८ लाख रुपयांची कथित लाच दिल्याचे हे प्रकरण आहे. या प्रकरणात एनआयएसपी व एनएमडीसीच्या आठ अधिकारी व दोन अधिकाऱ्यांविरोधात कथित लाच घेतल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला.

निवडणूक आयोगाने २१ मार्च रोजी जारी केलेल्या आकडेवारीनुसार, मेघा इंजिनिअरिंग कंपनी ही निवडणूक रोखे करणारी दुसरी मोठी कंपनी होती. या कंपनीने ९६६ कोटी रुपयांचे निवडणूक रोखे खरेदी केले. यातील ५८६ कोटी रुपये भाजपला दान केले. कंपनीने बीआरएसला १९५ कोटी, द्रमुकला ८५ कोटी, वायएसआरसीपीला ३७ कोटी, टीडीपीला २५ कोटी, तर काँग्रेसला १७ कोटी रुपये मिळाले. सीबीआयने १० ऑगस्ट २०२३ रोजी जगदलपूर येथील स्टील कंपनीत इंटेक वेल व पंप हाऊस व क्रॉस कंट्री पाइपलाईन कार्याशी संबंधित ३१५ कोटी रुपयांच्या योजनेतील लाचप्रकरणी एफआयआर दाखल केला होता. प्राथमिक तपासातील निष्कर्षानुसार, १८ मार्चला कथित लाचप्रकरणी एक गुन्हा दाखल करण्याची शिफारस केली. तो ३१ मार्च रोजी दाखल केला.

सीबीआयने एनआयएसपी व एनएमडीसी लिमिटेडच्या आठ अधिकाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल केला. निवृत्त कार्यकारी संचालक प्रशांत दश, संचालक (उत्पादन) डी. के. मोहंती, डीजीएम पी. के. भुइयां, डी. एम. नरेश बाबू, सीनिअर मॅनेजर सुब्रो बनर्जी, निवृत्त मुख्य महाव्यवस्थापक (वित्त) एल. कृष्ण मोहन, महाव्यवस्थापक (वित्त) राजशेखर, मॅनेजर (वित्त) सोमनाथ घोष यांनी कथितपणे ७८ लाख रुपयांची लाच घेतली.

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

Maratha Reservation : ''...नाहीतर १००-२०० किमीच्या रांगा लागतील''; मनोज जरांगेंचा राज्य सरकारला इशारा

''मानाला भुकालेलं पोरगं''; मनोज जरांगे यांची राज ठाकरेंवर टीका

बोलणी फिस्कटली; आंदोलन सुरूच! मनोज जरांगे-शिंदे समिती यांच्यातील चर्चा निष्फळ, हैदराबाद गॅझेट लागू करण्यास सरकारची तत्त्वतः मंजुरी

मराठी अभिनेत्री प्रिया मराठेचे निधन; कर्करोगाशी झुंज ठरली अपयशी, वयाच्या ३८ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास