राष्ट्रीय

मोहल्ला क्लिनिकद्दारे बनावट चाचण्यांची सीबीआय चौकशी करा! नायब राज्यपाल सक्सेना यांनी दिले आदेश

ही बाब गंभीर असून शेकडो कोटींचा (रुपयांचा) घोटाळा चालल्याचे ती निदर्शक आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्लीच्या मोहल्ला क्लिनिकमध्ये कथित बनावट लॅब चाचण्या आणि बनावट रुग्णांची सीबीआय चौकशी करण्याची शिफारस नायब राज्यपाल व्ही. के. सक्सेना यांनी केली आहे, असे राज निवास अधिकाऱ्यांनी गुरुवारी सांगितले.

सक्सेना यांनी दिल्लीच्या सरकारी रुग्णालयांना ‘गुणवत्तेच्या मानक चाचण्या’त अपयशी औषधांच्या कथित पुरवठ्याची सीबीआय चौकशी करण्याचे आदेश दिल्यानंतर काही दिवसांनी ही कारवाई सुरू झाली आहे. दिल्लीचे आरोग्य मंत्री सौरभ भारद्वाज म्हणाले की, आप सरकारने गेल्या वर्षी मोहल्ला क्लिनिकमधील अनेक डॉक्टर आणि कर्मचाऱ्यांना चुकीच्या कृत्यांसाठी डी-पॅनेल केले होते आणि आरोग्य सचिवांना बडतर्फ करण्याची मागणी देखील केली होती.

अधिकाऱ्यांच्या म्हणण्यानुसार, दिल्ली सरकारी रुग्णालये आणि मोहल्ला दवाखान्यात जाणाऱ्या रुग्णांच्या नावाने खासगी प्रयोगशाळांना पैसे देऊन प्रयोगशाळेच्या चाचण्यांमध्ये फसव्या पद्धती प्रचलित असल्याचे आढळून आले आहे. ही बाब गंभीर असून शेकडो कोटींचा (रुपयांचा) घोटाळा चालल्याचे ती निदर्शक आहे. सक्सेना यांनी डिसेंबर २०२२ मध्ये या संबंधातील हे निर्देश जारी केल्याचे एका अधिकाऱ्याने सांगितले.

'बॅचलर्सना परवानगी नाही' म्हणत मालकिणीलाच घर खाली करायला सांगितलं; सोसायटी बोर्ड मेंबर्सना २२ वर्षांच्या तरुणीने शिकवला धडा

ठाकरे बंधूंचं अखेर ठरलं! वेळ आणि स्थळही सांगितलं; संजय राऊत यांची पोस्ट पुन्हा चर्चेत

राज ठाकरे-उद्धव ठाकरे युतीवर सुप्रिया सुळेंचे भाष्य; "ठाकरे बंधू एकत्र आले तर...

गेमिंग इंडस्ट्रीला मोठा धक्का! भरधाव Ferrari चा भीषण अपघात; Call of Duty गेमचे सहनिर्माते विन्स झॅम्पेला यांचा मृत्यू - Video व्हायरल

BCCIचा मोठा निर्णय! महिला खेळाडूही होणार मालामाल; देशांतर्गत क्रिकेटपटूंच्या मॅच फीमध्ये दुप्पट वाढ