NEET-UG 2026 Paper Leak Case : ‘नीट’ घोटाळ्यातील पाच आरोपी न्यायालयात 
राष्ट्रीय

NEET-UG 2026 Paper Leak Case : ‘नीट’ घोटाळ्यातील पाच आरोपी न्यायालयात

'केंद्रीय अन्वेषण विभागा'ने (सीबीआय) बुधवारी 'नीट'-यूजी २०२६ परीक्षा पेपरफुटीप्रकरणी अटक केलेल्या पाचही आरोपींना दिल्ली न्यायालयासमोर हजर केले.

Swapnil S

नवी दिल्ली : 'केंद्रीय अन्वेषण विभागा'ने (सीबीआय) बुधवारी 'नीट'-यूजी २०२६ परीक्षा पेपरफुटीप्रकरणी अटक केलेल्या पाचही आरोपींना दिल्ली न्यायालयासमोर हजर केले. सीबीआयचे विशेष न्यायाधीश अजय गुप्ता यांच्यासमोर या पाचही आरोपींना सादर करण्यात आले.

या आरोपींना कथित सहभागाबद्दल वेगवेगळ्या राज्यांमधून ताब्यात घेण्यात आले होते.नाशिक येथील शुभम खैरनार, जयपूर येथील मांगीलाल बिवल, विकास बिवल आणि दिनेश बिवल, तसेच गुरुग्राम येथील यश यादव अशी आरोपींची नावे आहेत. नाशिक जिल्ह्यातील नांदगाव येथील रहिवासी असलेल्या ३० वर्षीय खैरनारला मुंबईतून दोन दिवसांची ट्रान्झिट रिमांड मिळाल्यानंतर सीबीआयने दिल्लीत आणले होते. खैरनार हा परीक्षेचा पेपर लीक करण्यात कथितपणे सामील होता.

सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करा; अर्थमंत्री सीतारामन यांचे प्राप्तिकर विभागाला निर्देश

Nashik : भरधाव ट्रक फ्लायओव्हरवरून थेट ५० फूट खाली कोसळला; सिन्नरमधील भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

महाराष्ट्रात ८७.७९ टक्के मतदार अर्जांचे वाटप पूर्ण; १ लाखाहून अधिक BLO कडून मतदार याद्यांचे पुनरीक्षण

Mumbai : तीन वर्षांची असताना गिळलं टोपण; टीबी-दमा समजून डॉक्टरांनी ७ वर्षे केले चुकीचे उपचार, अखेर मुलीच्या फुफ्फुसाचा भाग काढला

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार