राष्ट्रीय

तीन भाषा धोरणाचे चंद्राबाबूंकडून समर्थन

राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत तीन भाषा धोरणावरून वाद पेटला आहे. आता तीन भाषा धोरणाच्या समर्थनार्थ आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू उतरले आहेत.

Swapnil S

हैदराबाद : राष्ट्रीय शिक्षण धोरणांतर्गत तीन भाषा धोरणावरून वाद पेटला आहे. आता तीन भाषा धोरणाच्या समर्थनार्थ आंध्रचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू उतरले आहेत.

विधानसभेत बोलताना ते म्हणाले की, भाषा हे ज्ञानाचे साधन नाही, तर संवादासाठी आवश्यक आहे. माझी मातृभाषा तेलगू आहे. राष्ट्रीय भाषा हिंदी, तर आंतरराष्ट्रीय भाषा इंग्रजी आहे. आपल्याला जीवन जगण्यासाठी जितक्या भाषा शिकता येतील तितक्या शिकाव्यात, पण आपल्या मातृभाषेला कोणीही विसरू नये. पण, हिंदी भाषा शिकल्यास दिल्ली व देशाच्या अन्य भागात संवाद साधण्यास मदत मिळते. त्यातून फायदा मिळतो, असे ते म्हणाले.

हिंदी भाषा शिकल्यास दिल्लीत अस्खलित संवाद साधता येऊ शकेल. राजकारणाखेरीज जास्तीत जास्त भाषा कशा शिकता येतील, हे सर्वांनी पाहिले पाहिजे. ते लोक आपल्या मातृभाषेचा अभिमान बाळगतात, ते जगात यशस्वी होतात, असे त्यांनी सांगितले. ते पुढे म्हणाले की, भाषा हे संवादाचे माध्यम आहे. भाषेतून तुम्हाला ज्ञान मिळणार नाही.

जे लोक मातृभाषा शिकले आहेत आणि अभिमानाने बोलतात ते जगात उच्चपदावर बसले आहेत. आंध्र प्रदेशला गरज लागल्यास आपल्या जनतेसाठी जपानी, जर्मन आदी अतिरिक्त भाषा शिकण्याची सुविधा दिली जाईल, असे नायडू यांनी सांगितले.

Pune Ganesh Visarjan 2025 : पुण्यात मानाच्या गणपतींच्या मिरवणुकीत भक्तांचा उत्साह; पारंपरिक जल्लोषात विसर्जन

पालखी निघाली राजाची...लालबागच्या राजाच्या विसर्जन मिरवणुकीला प्रारंभ; भाविकांना अश्रू अनावर | Video

Mumbai : मुंबापुरी गणेश विसर्जनासाठी सज्ज; मुंबईच्या वाहतुकीत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Pune : गणेश विसर्जन मिरवणुकीसाठी पुणेकर सज्ज; वाहतूक व्यवस्थेत मोठे बदल, जाणून घ्या कोणते रस्ते राहणार बंद

Mumbai : मित्राला अडकवण्यासाठी मुंबईत बॉम्बस्फोटाची धमकी; नोएडामधून ज्योतिषाला अटक