राष्ट्रीय

'चांद्रयान ३' सुस्थितीत, लँडिंगसाठी शोधतंय सुरक्षित जागा; इस्त्रोन फोटो शेअर करत दिली माहिती

नवशक्ती Web Desk

भारताची महत्त्वाकांक्षी चांद्रमोहीम आता शेवटच्या टप्प्यात आली आहे. चांद्रयान आता काही तासांमध्ये चंद्रावर लँडिंग करण्यासाठी सज्ज झालं आहे. त्यासाठी ते एक सुरक्षित जागा शोधत आहे. काल इस्रोने ट्विट शेयर करत 'चांद्रयान-3' च्या लँडिंगची तारीख आणि वेळ सांगितली होती. दि.23 ऑगस्ट(बुधवार) 2023 रोजी 'चांद्रयान-3' हे चंद्रावर सॉफ्ट लँडिंग करणार असून सायंकाळी 6 वाजून 4 मिनिटांनी हे लँडिंग करणात होणार आहे. सध्या 'चांद्रयान-3' हे पूर्णपणे सुस्थितीत आहे. आता ते लँडिंगसाठी तयार आहे, असं इस्रोने स्पष्ट केलं आहे.

अनेक अडथळ्यांचा सामना करून 'चांद्रयान 3' हे सुखरूप आपल्या लक्ष्यापर्यंत पोहचले आहे. चांद्रयानने यशस्वीपणे चंद्रावर लँडिंग केल्यानंतर चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर लँडिंग करणारा भारत हा एकमेव देश ठरणार आहे. लँडिंगची प्रक्रिया ही १७ ऑगस्टपासून सुरु झाली असून योग्य जागा भेटल्यानंतचं चांद्रयानचं लँडिंग होणार आहे. संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या या चांद्र मोहिमेवर लागलं आहे. 'चांद्रयान ३' चंद्राच्या दक्षिण धृवावर यशस्वीरित्या लँडिंग झाल्यास भारतासाठी ही सर्वात खूप मोठी एक अचिव्हमेंट ठरणार आहे.

काल 'चांद्रयान-3' पूर्वीच रशियाचं 'लूना-25' हे चंद्राच्या दक्षिण भागामध्ये लँड होणार होतं. मात्र, काही तांत्रिक अडचणींमुळे 'लूना 25' चं लँडर हे चंद्रावर क्रॅश झालं. त्यामुळे रशियाचं सर्वात आधी चंद्राच्या दक्षिण धृवावर उतरण्याचं स्वप्न भंगलं आहे. फक्त रशियासाठीच नाही, तर संपूर्ण जगासाठी ही एक दुर्दैवी घटना आहे. या सगळ्यामुळे आता सर्वांचं लक्ष आता भारताच्या 'चांद्रयान ३' मोहिमेकडे लागलं आहे. लँडर हॅझार्ड डिटेक्शन अँड अवॉयडन्स कॅमेऱ्याच्या सहाय्याने समजतंय की, चांद्रयान सध्या सुरक्षित जागा शोधत आहे. उतरताना दगड किंवा खोल खंदक नसेल अथवा इतर अडथळे बघूनच चांद्रयान लँड करेल, अशी माहिती इस्त्रोकडून देण्यात आली आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त