राष्ट्रीय

भारतासह जगभरात ‘चॅटजीपीटी’ बंद; वापरकर्त्यांकडून सोशल मीडियावर तक्रारी

भारतासह जगभरातील ‘चॅटजीपीटी’ बंद पडल्याचा फटका मंगळवारी शेकडो वापरकर्त्यांना बसला. ‘डाऊनडिटेक्टर’ या संकेतस्थळानुसार, भारतात दुपारी ३ वाजल्यापासून ‘चॅटजीपीटी’ वापरताना अडचणी येत असल्याची तक्रार अनेकांनी सोशल मीडियावर नोंदविली.

Swapnil S

नवी दिल्ली : भारतासह जगभरातील ‘चॅटजीपीटी’ बंद पडल्याचा फटका मंगळवारी शेकडो वापरकर्त्यांना बसला. ‘डाऊनडिटेक्टर’ या संकेतस्थळानुसार, भारतात दुपारी ३ वाजल्यापासून ‘चॅटजीपीटी’ वापरताना अडचणी येत असल्याची तक्रार अनेकांनी सोशल मीडियावर नोंदविली.

या तक्रारींपैकी ८२ टक्के तक्रारी वेबवर ‘चॅटजीपीटी’ वापरताना अडचणी येत असल्याच्या आहेत, तर १४ टक्के युजर्सनी ‘मोबाइल अॅप्लिकेशन’ वापाताना अडचण येत असल्याची तक्रार केली आहे. तसेच चार टक्के युजर्सनी ‘एपीआय इंटिग्रेशन’शी संबंधित तक्रार केली आहे. केवळ भारतातूनच नव्हे, तर जगभरातून या तक्रारी येत होत्या.

तक्रारींची दखल

महत्त्वाचे म्हणजे ‘ओपन एआय’नेही या तक्रारींची दखल घेतली असून यासंदर्भात निवेदन जारी केले. 'काही युजर्सना चॅटजीपीटी वापरण्यास अडचणी येत असल्याचे आमच्या निर्दशनास आले आहे. आम्ही याची दखल घेतली असून ती सोडवण्याचा प्रयत्न करत आहोत', अशी प्रतिक्रिया ‘ओपन एआय’कडून देण्यात आली आहे.

कामे रखडली

दरम्यान, ‘चॅटजीपीटी’ बंद पडल्याने अनेकांनी सोशल मीडियावर नाराजी व्यक्त केली आहे. शैक्षणिक तसेच इतर कामांसाठी ‘चॅटजीपीटी’चा वापर मोठ्या प्रमाणावर केला जात आहे. त्यामुळे त्यांची कामे रखडली असल्याची तक्रार सोशल मीडिया युजर्सनी केली आहे.

"भगवा आणि हिंदुत्वाचा विजय"; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणात निर्दोष ठरल्यानंतर साध्वी प्रज्ञा सिंह यांना अश्रू अनावर

2008 Malegaon Blast : 'दंगलींचे शहर' बॉम्बस्फोटाने काळवंडले! मालेगावच्या इतिहासातील काळा दिवस

"भारत-रशियाने मिळून त्यांची आधीच डबघाईस आलेली अर्थव्यवस्था..."; टॅरिफच्या तडाख्यानंतर ट्रम्प यांचा थेट निशाणा

2008 Malegaon Blast : ठोस पुरावेच नाही! साध्वी प्रज्ञा, पुरोहित यांच्यासह सातही आरोपी निर्दोष, १७ वर्षांनंतर आला निकाल

अमेरिकेचा भारताला तडाखा; भारतीय ‌वस्तूंवर १ ऑगस्टपासून २५ टक्के ‘टॅरिफ’