प्रातिनिधिक छायाचित्र  एएनआय
राष्ट्रीय

छत्तीसगडमध्ये १० नक्षलवाद्यांचा खात्मा; एक कोटीचे बक्षीस असलेला ‘टॉप’चा नेता बालकृष्णही ठार; सुरक्षा दलांची धडक कारवाई

छत्तीसगडच्या गरियाबंदमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी गुरुवारी १० नक्षलवाद्यांचा खात्मा केला. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये १ कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या मनोज ऊर्फ मोडेम बालकृष्ण याचाही समावेश आहे. बालकृष्णचा मृत्यू हे सुरक्षा दलांसाठी मोठे यश मानले जात आहे.

Swapnil S

रायपूर : छत्तीसगडच्या गरियाबंदमध्ये झालेल्या चकमकीत सुरक्षा दलांनी गुरुवारी १० नक्षलवाद्यांचा खात्मा केला. ठार झालेल्या नक्षलवाद्यांमध्ये १ कोटी रुपयांचे बक्षीस असलेल्या मनोज ऊर्फ मोडेम बालकृष्ण याचाही समावेश आहे. बालकृष्णचा मृत्यू हे सुरक्षा दलांसाठी मोठे यश मानले जात आहे.

गोपनीय माहितीच्या आधारे पोलिसांनी गरियाबंदमध्ये ही धडक कारवाई केली. नक्षलवाद्यांचा टॉपचा नेता बालकृष्ण याच परिसरात असल्याची खातरजमा केल्यानंतर सुरक्षा दलांनी बुधवारी ‘ऑपरेशन’ सुरू केले. त्याला गुरुवारी यश मिळाले. बालकृष्णवर १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. गरियाबंदपासून काही अंतरावर सुरक्षा दलांनी नक्षलवाद्यांना घेरल्यानंतर जोरदार चकमक झडली. त्यात १० नक्षलवादी ठार झाले.

गरियाबंदमध्ये करण्यात आलेल्या धाडसी कारवाईत राज्य पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ), कोब्रा बटालियनच्या पथकांचा सहभाग होता. सुरक्षा दलांच्या चकमकीत मारला गेलेला मनोज उर्फ मोडेम बालकृष्ण हा ओदिशा राज्य समितीचा (ओएसजी) वरिष्ठ सदस्य होता.

गरियाबंद नक्षल्यांचा बालेकिल्ला

छत्तीसगडच्या आग्नेय भागात असलेला गरियाबंद जिल्हा बऱ्याच कालावधीपासून नक्षली कारवायांच्या केंद्रस्थानी राहिला आहे. हा जिल्हा नक्षलवाद्यांचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जातो. गेल्या काही वर्षांमध्ये या भागातील नक्षलवादी चळवळ कमजोर करणाऱ्या अनेक मोहिमा सुरक्षा दलांनी राबवल्या आहेत. त्यातील अनेक मोहिमांना यश आले असून त्यात नक्षलवाद्यांचे बरेचसे वरिष्ठ नेते मारले गेले आहेत, तर काही जण पकडले गेले आहेत.

नक्षली चळवळीला हादरा

मनोज ऊर्फ मोडेम बालकृष्ण नक्षली संघटनेतील टॉपचा नेता होता. त्याच्या नावावर अनेक गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. त्यात हत्या, लूटमार, पोलिसांवर हल्ले यांचा समावेश आहे. त्याच्यावर १ कोटी रुपयांचे बक्षीस जाहीर करण्यात आले होते. यावरून नक्षली चळवळीतील त्यांचे महत्त्व आणि दबदबा याचा अंदाज येतो. तो नक्षलवाद्यांच्या अनेक कारवायांचा प्रमुख सूत्रधार राहिला आहे. त्याच्या मृत्यूने नक्षली चळवळीला मोठा धक्का बसला आहे.

Mumbai : उद्यापासून एलफिन्स्टन पूल बंद; दक्षिण मुंबईत होणार वाहतूककोंडी; अनेक मार्गावरील वाहतुकीमध्ये बदल

लहान समाजात जन्मलो हे पाप आहे का?भुजबळांचा उद्विग्न सवाल; लातूरच्या कराड कुटुंबियांची सांत्वनपर भेट, मुंडेही उपस्थित

नेपाळ : आंदोलकांनी आग लावलेल्या हॉटेलमधून पळण्याच्या प्रयत्नात भारतीय महिलेचा मृत्यू

Ulhasnagar : सेंच्युरी कंपनीच्या कँटीनमध्ये बनावट कूपन घोटाळा उघडकीस; प्रिंटिंग प्रेसवर पोलिसांची कारवाई

धुळ्यात माजी स्थायी सभापतीच्या मुलाची आत्महत्या; वाढदिवसानंतर दोनच दिवसात उचललं टोकाचं पाऊल