छत्तीसगडमध्ये खासगी विमान कोसळले; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती 
राष्ट्रीय

छत्तीसगडमध्ये खासगी विमान कोसळले; अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती

छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यातील नारायणपूर परिसरातील आरा डोंगराजवळ एका खासगी विमान कोसळले असून त्यानंतर परिसरात गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Swapnil S

जशपूर : छत्तीसगडच्या जशपूर जिल्ह्यातील नारायणपूर परिसरातील आरा डोंगराजवळ एका खासगी विमान कोसळले असून त्यानंतर परिसरात गोंधळ आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. या विमान अपघातानंतरचा एक व्हिडिओही समोर आला आहे. यात विमान कोसळल्यानंतर मोठ्या प्रमाणात धूर पहायला मिळत आहे. त्यामुळे या अपघातात वैमानिक आणि सहवैमानिकासह अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या विमानात किती लोक होते हे अद्याप समजू शकलेले नाही. विमान ३० फूट उंचीवर उडत असताना क्रॅश झाले.

समोर आलेल्या माहितीनुसार हे खासगी विमान एका डोंगराला धडकले आणि त्यानंतर या विमानाला भीषण आग लागली. या अपघातानंतर मोठ्या ज्वाळा आणि धूर आकाशात पसरताना दिसला, ज्यामुळे आसपासच्या भागात भीतीचे वातावरण पसरले. ज्या ठिकाणी हे विमान कोसळले हो भाग दुर्गम आणि डोंगराळ आहे. या ठिकाणी पोहोचणे कठीण आहे. त्यामुळे मदत आणि बचावकार्यामध्ये अडचणी येत आहेत, मात्र तरीही प्रशासनाची पथके परिस्थिती नियंत्रणात आणण्याचा प्रयत्न करत आहेत.

या विमानातून किती प्रवासी प्रवास करत होते, याबाबत अद्याप माहिती समजू शकलेली नाही. प्रशासन सध्या हे विमान कुठे जात होते, याबाबतची माहिती गोळा करत आहे. परिस्थिती स्पष्ट झाल्यानंतरच अचूक आकडेवारी आणि संपूर्ण माहिती जाहीर केली जाईल अशी माहिती जारी केली जाईल अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली आहे.

कोलकात्यात बांधकामाधीन गोदामाचे छत कोसळले; ३ ठार, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

'सत्य सांगणं इतकं कठीण झालंय का?' केतन अग्रवाल प्रकरणावर हिना खानची प्रतिक्रिया; म्हणाली, "त्याचा जीव वाचला असता...

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार