नवी दिल्ली : मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना आधीच ‘झेड प्लस’ सुरक्षा कवच मिळाले आहे. मात्र, या आठवड्यात त्यांच्याविरोधात तीव्र निदर्शने सुरू असून, काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी निवडणूक आयुक्तांवर ‘मतचोरीचा’ गंभीर आरोप करत त्यांच्या राजीनाम्याची मागणी केल्याच्या पार्श्वभूमीवर मुख्य निवडणूक आयुक्तांची सुरक्षा आणखी कडक करण्यात आली आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे.
मतदारयाद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षणामधील (एसआयआर) गैरव्यवहारांच्या मुद्द्यावरून काँग्रेस आणि विरोधकांच्या 'इंडिया' आघाडीने मुख्य निवडणूक आयुक्तांच्या राजीनाम्याची मागणी आक्रमकपणे रेटून धरली आहे, ज्यामुळे रस्त्यावरील आंदोलने अधिक तीव्र झाली आहेत. आंदोलकांनी आयुक्तांच्या निवासस्थानाजवळ धडक दिल्यानंतर आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या इतर ठिकाणच्या घराबाहेर निदर्शने केल्यानंतर सुरक्षेमध्ये ही वाढ करण्यात आली आहे.