राष्ट्रीय

मुख्यमंत्री दिग्विजय सिंह अध्यक्षपदाच्या शर्यतीत?

काँग्रेसमध्ये बंडाळी निर्माण झाल्याने तेथील स्थितीचा अहवाल ॲन्टोनी यांनी सोनियांना सादर केला आहे.

वृत्तसंस्था

राजस्थानमधील तिढ्याचे सावट काँग्रेसच्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीवर पडले असून, यातून मार्ग काढण्यासाठी काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी बुधवारी पक्षातील ज्येष्ठ नेते ए. के. ॲन्टोनी यांची भेट घेऊन चर्चा केली. दरम्यान, मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री दिग्विजय सिंह हे अध्यक्षपदाच्या शर्यतीत असू शकतात, असे संकेत काँग्रेसच्या सूत्रांनी दिले आहेत.

राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदावरून काँग्रेसमध्ये बंडाळी निर्माण झाल्याने तेथील स्थितीचा अहवाल ॲन्टोनी यांनी सोनियांना सादर केला आहे. याबाबत सोनियांनी ॲन्टोनींशी चर्चा केली. मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांच्या समर्थकांच्या बंडामुळे गेहलोत यांची पक्षाध्यक्षपदी निवड होण्याची शक्यता धूसर झाली आहे. या पार्श्वभूमीवर सोनियांनी काँग्रेस पक्षाध्यक्षपदासाठी संभाव्य उमेदवार कोण असावा, याबाबत ॲन्टोनींशी चर्चा केल्याचे समजते.

अध्यक्षपदासाठी उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख ३० सप्टेंबर आहे.

दरम्यान, ज्येष्ठ काँग्रेस नेते दिग्विजय सिंह यांनीही अध्यक्षपदाच्या शर्यतीत उतरण्याचे संकेत दिले असून, ते त्यासाठी दिल्लीत येण्याची शक्यता आहे. त्यांना पक्षश्रेष्ठींचा पाठिंबा आहे की नाही, हे स्पष्ट झालेले नाही.

राजस्थान मुख्यमंत्रिपदाचा लवकरच निर्णय

दरम्यान, मुख्यमंत्रिपदासाठी गहलोत गटाकडून विरोधाचा सामना करत असलेले सचिन पायलट सध्या दिल्लीत तळ ठोकून आहेत. आतापर्यंत पायलट यांनी केवळ हायकमांडच्या निर्णयाची वाट पाहत असल्याचे सांगितले आहे. त्यांचे मौन गंभीर मानले जात आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राजस्थानच्या मुख्यमंत्रिपदाबाबतही लवकरच निर्णय घेतला जाऊ शकतो.

जागावाटपाचा निर्णय दोन दिवसांत - मुख्यमंत्री; शिंदे सेनेची ६० जागांवर बोळवण?

श्रमिकांच्या जगण्यातला राम संपला

‘महाराष्ट्रात दबावाचे राजकारण’

आजचे राशिभविष्य, २० डिसेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

IND vs SA: मालिका विजयाची आज संधी; अहमदाबाद येथे भारतीय संघाचा दक्षिण आफ्रिकेशी पाचवा टी-२० सामना