राष्ट्रीय

"चीनेने आपली जमीन हिसकावली", राहुल गांधी यांचा मोठा दावा

नवशक्ती Web Desk

काँग्रेस नेते राहुल गांधी हे सध्या लडाख दौऱ्यावर आहेत.या दरम्यान त्यांनी त्यांचे वडील राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त श्रध्दांजली वाहिली. यावेळी बोलताना राहुल गांधी यांनी जीनच्या घुसखोरी बद्दल मोठं विधान केलं आहे.चिनी सैन्य या भागात घुसल्याचं राहुल गांधी म्हणाले आहे.चीनने आपली जमीन हिसकावून घेतली आहे.या लोकांची चाराईची जमीन हिसकावून घेण्यात आली आहे. पण पंतप्रधान म्हणाले की, एक इंचही जमीन हिसकावून घेतलेली नाही. पण हे खरे नाही. तुम्ही येथे कोणालाही विचारु शकता.

लडाखच्या लोकांच्या खूप तक्रारी होत्या. त्यांना देण्यात आलेल्या दर्जावर ते खूश नाहीत. त्यांना प्रतिनिधित्व हवं आहे. याठिकाणी बेरोजगारीची समस्या आहे. येथील लोक नोकरशाहीने राज्य चालवू नये, जनतेच्या माध्यमातून राज्य चालवावं, असं म्हणत असल्याचं राहुल यांनी सांगितलं.

राहुल गांधी यांनी त्यांचे वडील आणि भारताचे दिवंगत पंतप्रधान राजीव गांधी यांच्या जयंतीच्या पूर्वसंध्येला शनिवारी लेह ते केंद्रशासित प्रदेश लडाखमधील पँगॉन्ग त्सो सरोवरापर्यंत बाईक वरून प्रवास केला. ऑगस्ट २०१९ मध्ये जम्मू-काश्मीरचे दोन केंद्रशासित प्रदेशांमध्ये विभाजन आणि जम्मू-काश्मीर आणि लडाखचे विभाजन झाल्यानंतर राहुल यांचा हा पहिलाच लडाख दौरा होता. पुढील आढवड्यात ते कारगिलला भेट देण्याची शक्यता आहे.राहुल गांधी यांचा लडाख दौरा हा अराजकीय असल्याचं काँगेसच्या नेत्यांनी सांगितलं. मात्र, गुरुवारी राहुल गांधी यांचं आगमन झाल्यानंतर त्यांच जंगी स्वागत करण्यात आलं.

घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील आरोपी भावेश भिंडेला अटक

ठाकरे गटाचा पाठिंबा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! ‘एनडीए’ला बहुमत मिळणार; देवेंद्र फडणवीस यांना विश्वास

धक्कादायक! दहा वर्षाच्या चिमुकल्याचा गळा चिरून मृतदेह खाडीत फेकला, हत्येप्रकरणी वडिलांच्या मित्राला अटक

वांद्रे ते मरीन ड्राईव्ह फक्त १२ मिनिटांत! २.५ हजार मेट्रिक टन वजनाचा गर्डर लाँच

हनीमूनवर जाण्यापूर्वी कधीच करू नका 'ही' चूक, नाहीतर...