राष्ट्रीय

कंगनाच्या कानाखाली मारणाऱ्या CISF कॉन्स्टेबलचं ट्रान्सफर, नवऱ्याचीही बदली!

Suraj Sakunde

नवी दिल्ली: प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री आणि भाजप खासदार कंगना रणौत यांना चंदीगड विमानतळावर थप्पड मारणारी महिला CISF कॉन्स्टेबल कुलविंदर कौरची बदली करण्यात आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, महिलेसोबत तिच्या पतीचीही बदली झाली आहे. चंदिगड विमानतळावर कंगना रणौत यांना कानाखाली मारल्याच्या घटनेनंतर कुलविंदर कौरला निलंबित करण्यात आलं होतं. आता तिची बंगळुरू येथे बदली करण्यात आली आहे.

महिला कॉन्स्टेबलने कंगनाला का मारले?

कंगना यांना कानाखाली मारल्यानंतर संबंधित महिला कॉन्स्टॅबलचा एक व्हिडिओ समोर आला होता, ज्यामध्ये तिने यामागचे कारण सांगितले होते. व्हिडिओमध्ये ती महिला म्हणताना दिसत आहे, की "शेतकरी आंदोलनात महिला प्रत्येकी १००-१०० रुपये घेऊन बसल्याचं वक्तव्य कंगनानं केलं होतं. त्यावेळी माझी आई शेतकरी आंदोलनात जात होती."

काय होतं संपूर्ण प्रकरण?

कंगना रणौत यांनी हिमाचल प्रदेशातील मंडी येथून लोकसभा निवडणूक जिंकली आहे. त्या आता खासदार झाल्या आहेत. त्यामुळे कंगना गेल्या महिन्यात दिल्लीला जाण्यासाठी चंदीगड विमानतळावरून निघाल्या होत्या. मात्र सुरक्षा तपासणीनंतर त्यांना या प्रसंगाला सामोरं जावं लागलं. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाला असून त्यात कंगना कानाखाली मारल्यानंतर खूप संतापल्याचं पाहायला मिळत आहे. ती लेडी कॉन्स्टेबलसोबत वाद घालतानाही दिसली. यावेळी त्यांची टीम त्यांचा बचाव करताना दिसली. तिथून कंगनाला फ्लाइटच्या दिशेने नेण्यात आले. कंगना यांनी दिल्ली गाठून सीआयएसएफच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडे या प्रकरणाची तक्रार केली.

आजि सोनियाचा दिनु...मराठीला अभिजात भाषेचा दर्जा; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय

मंत्रालयात नरहरी झिरवळांसह आदिवासी आमदार आक्रमक; तिसऱ्या मजल्यावरुन संरक्षक जाळीवर मारल्या उड्या (Video)

जातीवर आधारित भेदभावाचे कारागृह नियम SC कडून रद्द, राज्यांना नियमांमध्ये सुधारणा करण्यासाठी ३ महिन्यांची मुदत

वाढत्या धमकावण्यांमुळे मुस्लीम समाज धास्तावलाय : अबू आझमी; सपा १२ जागांसाठी आग्रही

दसरा मेळाव्याला विरोधकांचा फडशा पाडणार, उद्धव ठाकरेंचा महायुतीला इशारा; ‘मशाल हाती घे, सत्वर भूवरी ये’ गाण्याचे अनावरण