राष्ट्रीय

खळबळजनक! सरकारी शाळेच्या हॉस्टेलमधील 9 वीच्या विद्यार्थिनीने दिला बाळाला जन्म, POCSO अंतर्गत गुन्हा दाखल; मात्र, अजूनही...

Rakesh Mali

कर्नाटकातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. कर्नाटकच्या चिक्काबल्लापुरामधील सरकारी शाळेच्या वसतीगृहातील नववी इयत्तेत शिकणाऱ्या 14 वर्षाच्या विद्यार्थिनीने बाळाला जन्म दिला आहे. या घटनेनंतर खळबळ उडाली असून वसतीगृह वॉर्डनला तातडीने निलंबित करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणी बाल लैंगिक अपराध संरक्षण कायदा (पोक्सो) अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मात्र, अद्याप कोणालाही अटक झालेली नाही.

पोटात दुखत असल्याने घटना उघडकीस-

मिळालेल्या माहितीनुसार, वर्षभरापूर्वी ही विद्यार्थिनी या वसतीगृहात आली होती. ती वारंवार हॉस्टेलमधून गैरहजर राहत होती. ती चिक्काबलपुरा जिल्ह्यातील बागेपल्ली तालुक्यातील आपल्या गावी गेली असता तिने पोटात दुखत असल्याचे आई-वडीलांना सांगितले. यानंतर तिला रुग्णालयात नेले असता ती गर्भवती असल्याचे निदान झाले आणि घरच्यांना धक्काच बसला.

मुली आणि बाळाची प्रकृती स्थिर-

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, संबंधित मुलीला रुग्णालयात दाखल केल्यानंतर तिच्या सर्व वैद्यकीय तपासण्या करण्यात आल्या. यानंतर नऊ जानेवारी रोजी तिने एका बाळाला जन्म दिला. मुलीचे वजन कमी असले तरी प्रसुतीनंतर तिची आणि बाळाची प्रकृती स्थिर असल्याचे माहिती आहे. प्रसुतीनंतर रुग्णालय प्रशासनाने पोलिसांना माहिती दिली, त्यानंतर कलम 376(बलात्कार) आणि पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

सिनियर विद्यार्थ्यामुळे गर्भवती?

अल्पवयीन पण सिनियर विद्यार्थ्याने गर्भवती केल्याचे तिने समुपदेशकांना सांगितल्याची माहिती पोलिसांनी दिली. यानंतर संबंधित मुलाला याबाबात विचारणा केली असता त्याने याला नकार दिला. या प्रकरणी गुन्हा दाखल केला गेला आहे. मात्र, एवढी गंभीर घटना असून अद्याप कोणालाही अटक करण्यात आलेली नाही. विद्यार्थिनी आणि पालक मोकळेपणाने उत्तरे देत नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगितले गेले आहे. तसेच, त्यांचे समुपदेशन केले जात असल्याचेही ते म्हणाले.

दुसऱ्या मुलाचेही घेतले नाव

मीडिया रिपोर्टनुसार, विद्यार्थिनी आपल्या जबाबावर ठाम नसून तिने अन्य एका विद्यार्थ्याचेही नाव घेतले आहे. आम्ही त्याची देखील चौकशी करुन या प्रकरणाचा छडा लावण्याचा प्रयत्न करत असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस