राष्ट्रीय

सीएनजी-पीएनजी स्वस्त दरात उपलब्ध होणार, कंपन्यांना मिळणार औद्योगिक वापराचा गॅस

गेल्या वर्षभरात सीएनजी व पीएनजीच्या किंमती ७० टक्क्याने वाढल्याने नागरिकांना मोठा महागाईचा भडका सोसावा लागत आहे.

वृत्तसंस्था

गॅसच्या किंमती दिवसेंदिवस वाढत आहेत. स्वयंपाकाचा गॅस हजारांच्यावर गेला. तर वाहनांसाठी वापरण्यात येणारा सीएनजी ९० रुपये किलोच्या घरात पोहोचला आहे. गेल्या वर्षभरात सीएनजी व पीएनजीच्या किंमती ७० टक्क्याने वाढल्याने नागरिकांना मोठा महागाईचा भडका सोसावा लागत आहे. आता सरकारने औद्योगिक कंपन्यांना देण्यात येणाऱ्या गॅसचा पुरवठा शहरात गॅस वितरण करणाऱ्या कंपन्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे गॅस पुरवठा वाढल्यानंतर सीएनजी-पीएनजी स्वस्त दरात उपलब्ध होणार आहे.सध्या पेट्रोल १०६ रुपये लिटरमागे मिळते, तर सीएनजी किलोमागे ८६ रुपये आहे. सीएनजी व पेट्रोलच्या दरात फार तफावत राहिलेली नाही. वाढत्या किंमतीमुळे सीएनजी गाडीधारक चिंतेत पडले आहेत. पीएनजी व सीएनजीच्या वाढत्या किंमतीमुळे महागाई वाढून सामान्य जनतेचे बजेट पार कोलमडले आहे. त्यामुळे लोकांना दिलासा देण्यासाठी सरकारने उद्योगांकडून काही प्रमाणात नैसर्गिक वायू शहर गॅस वितरण कंपन्यांना देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे येत्या काळात या दोन्हींच्या किमती कमी होण्याची शक्यता आहे.

पेट्रोलियम मंत्रालयाने यासंदर्भात जारी केलेल्या अधिसूचनेत पूर्वीच्या आदेशात सुधारणा करण्याचे स्पष्ट केले आहे. गॅस वितरण करणाऱ्या कंपन्यांना घरगुती उत्पादित गॅसचे वाटप वाढवले जाणार आहे. महानगर गॅस लिमिटेड आणि दिल्लीतील इंद्रप्रस्थ गॅस लिमिटेड या गॅस वितरक कंपन्यांचे वाटप १७.५ दशलक्ष घनमीटरवरून २७.८ दशलक्ष घनमीटर करण्यात आले आहे. सध्या शहर गॅस वितरक कंपन्यांना केलेल्या वाटपातून ८३ टक्के मागणी पूर्ण केली जात होती. तर उर्वरित पुरवठ्यासाठी अत्यंत महागडा एलएनजी चढ्या दराने आयात केला जात होता. त्यामुळे सीएनजी आणि पीएनजीच्या किमतीही वाढल्या आहेत. आता या कंपन्यांना स्थानिक गॅस कच्चा माल म्हणून वापरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

विरार-अलिबाग अंतर दोन तासांत पार होणार; मल्टिमॉडेल मार्गिकेला राज्य मंत्रिमंडळाची मंजुरी

मराठा आंदोलनाचा विजय! अखेर मनोज जरांगे-पाटलांनी पाचव्या दिवशी उपोषण सोडले; राज्य सरकारकडून ८ पैकी ६ मागण्या मान्य

घटनेतील तरतुदींचे स्पष्टीकरण करणार, सर्वोच्च न्यायालयाची माहिती; राष्ट्रपती, राज्यपालांवर विधेयकावर कालावधीचे बंधन

चीनकडून भव्य लष्करी संचलनात अत्याधुनिक शस्त्रांचे आज प्रदर्शन

GST परिषदेची आज बैठक; दैनंदिन वापरातील वस्तूंवरील कर कमी होण्याची शक्यता