दिल्लीत ‘कॉकरोच’चे आज पुन्हा आंदोलन  
राष्ट्रीय

दिल्लीत ‘कॉकरोच’चे आज पुन्हा आंदोलन

‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी पंतप्रधान मोदींकडे आत्महत्या केलेल्या नीट विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली आहे. दीपके यांनी शुक्रवारी पंतप्रधानांना पत्रही लिहिले आहे. दरम्यान, ‘सीजेपी’ शनिवारी २० जून रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर पुन्हा आंदोलन करणार आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : ‘कॉकरोच जनता पार्टी’चे संस्थापक अभिजीत दीपके यांनी पंतप्रधान मोदींकडे आत्महत्या केलेल्या नीट विद्यार्थ्यांच्या कुटुंबांना प्रत्येकी एक कोटी रुपयांची भरपाई देण्याची मागणी केली आहे. दीपके यांनी शुक्रवारी पंतप्रधानांना पत्रही लिहिले आहे. दरम्यान, ‘सीजेपी’ शनिवारी २० जून रोजी दिल्लीतील जंतर-मंतरवर पुन्हा आंदोलन करणार आहे. यापूर्वी त्यांनी नागपूर, जयपूर, बंगळुरू, हैदराबाद, पुणे आणि अमृतसर येथे आंदोलन केले आहे.

केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीही पत्रात केली. त्यांनी लिहिले की, देशातील वातावरण तरुणांच्या जीवनावर आणि मानसिक आरोग्यावर परिणाम करत आहे. त्यांनी इशारा दिला की, कारवाई न झाल्यास विद्यार्थी आणि पालकांमध्ये निराशा आणखी वाढू शकते. देशात गेल्या ३६ दिवसांत नीट परीक्षेसंबंधित १२ विद्यार्थी-विद्यार्थिनींनी आत्महत्या केली आहे. इंदूरमध्ये नीटची तयारी करत असलेली विद्यार्थिनी गुरुवारी रात्री उशिरा तिसऱ्या मजल्यावरून खाली पडली. गंभीर अवस्थेत तिला आधी खासगी रुग्णालयात आणि नंतर एम. वाय. हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले. शुक्रवारी सकाळी तिचा मृत्यू झाला.

देशभरात केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणीसाठी सतत निदर्शने सुरू आहेत. याच प्रकरणात, अलीकडेच सोशल मीडियावरून सुरू झालेली ‘कॉकरोच जनता पार्टी’ ही संघटना देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये प्रधान यांच्या राजीनाम्याची मागणी करत आहे.

BEST संपाने मुंबईकरांचे हाल! केवळ ४८ बसेस रस्त्यावर

BEST Strike : रिक्षाला लाईन, मेट्रोमध्ये मोठी गर्दी; बेस्ट संपाचा प्रवाशांना फटका

‘ऑपरेशन कमळ’ची गरज; उद्धव ठाकरेंचा जोरदार हल्लाबोल

पिक्चर अभी बाकी है! एकनाथ शिंदे यांनी ठाकरेंना डिवचले 

निवृत्तीवेतनधारकांसाठी १ जुलैपासून ‘महा-उपलब्धी’ ॲप