PM
राष्ट्रीय

आला थंडीचा महिना, त्वचा सांभाळा; 'या' साध्या टिप्स वापरा आणि रहा हेल्दी

थंडीमुळे त्वचा कोरडी पडणे, ओढ फाटणे, त्वचा लाला होणे अशा समस्या सुरु होतात. यावर वेळीच उपाय केले नाही, तर त्वचेचे नुकसान होऊ शकते.

Swapnil S

यंदा वातावरणीय बदलामुळे पाऊस बराच लांबला होता, त्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातल्याने हिवाळा थोडा उशिरा सुरु झाला. आता कुठे थंडीची जाणीव होऊ लागली आहे. महाराष्ट्रातील अनेक शहरांमध्ये लोक गुलाबी थंडीचा अनुभव घेताना दिसून इतर आहेत. मात्र तुम्हाला हे माहित आहे की, वातावरणीत बदलानंतर थंडीचा प्रभाव सर्वात आधी होतो तो आपल्या त्वचेवर, म्हणजे त्वचा कोरडी पडणे, ओढ फाटणे, त्वचा लाला होणे अशा समस्या सुरु होतात. यासर्वावर वेळीच उपाय केली नाही, तर त्वचेचे नुकसान होऊ शकते

सर्वात महत्वाचे म्हणजे थंडीमध्ये जी त्वचा कोरडी पडते ते टाळणे गरजेचे आहे. यासाठी छोटे आणि साधे उपाय केल्यास फरक पडू शकतो

  • अंघोळ करताना, शक्यतो साबणाचा वापर टाळा शॉवर जेल वापरा. अंघोळ केल्यावर त्वरित त्वचेवर मोश्चरायजर लावा.

  • अंघोळीनंतर त्वचेला टॉवेलने रगडू नये, तर फक्त टॅप करत अंग कोरडे करावे.

  • त्वचेमध्ये स्निग्धता टिकून राहील असा फेसवॉश वापरा. यासाठी तुम्ही 'क्लिंजर' चाही वापर करू शकता.

  • 'स्क्रब क्रिमचा वापर 'टाळावा तसेच, 'हिटर'मुळे त्वचा कोरडी पडते. यामुळे याबाबत अधिक काळजी घ्यावी.

  • अजून एक सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे, हिवाळ्यामध्ये अतिनील किरणे जास्त प्रमाणात सक्रिय असतात. यामुळे बाहेर पडताना सनस्क्रीन लावणे अत्यंत आवश्यक आहे.

  • गजकर्ण व सोरायसिस आजार किंवा त्वचेची अ‍ॅलजी असलेल्या लोकांनी याकाळात विशेष काळजी घ्यावी. कोणत्याही समस्येसाठी ताबडतोब डॉक्टरांचा सल्ला घेणेआवश्यक आहे.

  • ओठांच्या त्वचेमध्ये तैलग्रंथी नसल्यामुळे त्वचा सुकून ओठांना चिरा पडतात. यामुळे ओठांसाठी व्हॅसलिन, लिप बाम, लोणी, किंवा तुपाचा वापर नियमित करा..

  • थंडीमध्ये शक्यतो घट्ट कपडे वापरणे टाळा. या काळात सुटू कपड्यांचा जास्त वापर करा.

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली