नवी दिल्ली : निवडणूक प्रचारात पारदर्शकता यावी यासाठी होर्डिंग्जसह निवडणूक प्रचाराच्या छापील साहित्यावर मुद्रक आणि प्रकाशक यांचे नाव ठळकपणे नमूद करण्याचे आदेश बुधवारी निवडणूक आयोगाने दिले. राजकीय मजकूर असलेली अनेक निनावी होर्डींग्ज लावण्यात आली असल्याच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्यानंतर आयोगाने हे आदेश दिले आहेत.
होर्डिंग्जच्या ठरलेल्या जागा महापालिकेच्या नियंत्रणाखाली आहेत, काही होर्डिंग्जवरून मुद्रक आणि प्रकाशक यांची नावे गायब झाल्याचे आढळले असल्याबाबतच्या अनेक तक्रारी प्राप्त झाल्या. त्यानंतर निवडणूक आयोगाने वरील निर्णय घेतला.