ANI
ANI
राष्ट्रीय

सोनिया गांधींच्या ईडी चौकशीवरुन काँग्रेस आक्रमक, दिल्ली, मुंबईसह कार्यकर्त्यांचे देशव्यापी आंदोलन

प्रतिनिधी

नॅशनल हेराल्ड प्रकरणात अंमलबजावणी संचालनालयाने (ईडी) काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांना समन्स बजावलेले आहे. ईडीकडून सुरु झालेल्या या चौकशीच्या निषेधार्थ काँग्रेसने आक्रमक भूमिका घेतली आहे. दिल्ली, मुंबईसह काँग्रेसकडून देशव्यापी आंदोलन करण्यात येत आहे. अनेक ठिकाणी कार्यकर्ते रस्त्यावर उतरत ईडी आणि मोदी सरकारविरोधात घोषणाबाजी करताना दिसत आहे.

सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर सुरु असलेली कारवाई म्हणजे राजकीय सूड असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. या अगोदरही राहुल गांधी यांची ईडीकडून चौकशी सुरु असताना काँग्रेसकडून देशभरात आंदोलन करण्यात आली होती.

काँग्रेस नेत्यांचा पक्ष मुख्यालयापासून संसदेपर्यंत मोर्चा

सोनिया गांधी यांच्या ईडी चौकशी विरोधात काँग्रेस नेते आणि खासदारांनी अकबर रोड येथील पक्षाच्या मुख्यालयापासून संसदेपर्यंत मोर्चा काढला आहे. तसेच पटना, बिहारमध्येही काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाल्याचे पहायला मिळत आहे. सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांच्यावर सुरु असलेली कारवाई म्हणजे राजकीय सूड असल्याचा आरोप काँग्रेसने केला आहे. तपास यंत्रणा मोदी सरकारच्या कठपुतली बाहुल्या झाल्या असून सरकारच्या इशाऱ्यावर त्या केवळ विरोधी पक्षांच्या नेत्यांवरच कारवाई करत असल्याचा आरोप काँग्रेस नेत्यांनी केला आहे.

केंद्र सरकार ईडीसह केंद्रीय संस्थांचा गैरवापर करत आहे. लोकशाही धोक्यात आल्याचे हे लक्षण आहे. आमची लढाई देश वाचवण्यासाठी असल्याची टीका राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी केली आहे.

धक्कादायक! अर्धनग्न केलं अन् झाडाला बांधून केली अमानुष मारहाण...साताऱ्यातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

पुण्यासह सांगली,मिरज,कोल्हापूर आणि सोलापूर रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

सूनेनं केली सासऱ्याच्या घरात चोरी, मामेभावासोबत केलं परफेक्ट प्लॅनिंग, तीन लाखांची रोकड चोरली

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग