'नोटाबंदी'ने अर्थव्यवस्था उद्ध्वस्त, 'व्होटचोरी'मुळे लोकशाही धोक्यात; पंतप्रधान मोदींवर काँग्रेसचा हल्लाबोल  प्रातिनिधिक छायाचित्र
राष्ट्रीय

'नोटाबंदी'ने अर्थव्यवस्था उद्ध्वस्त, 'व्होटचोरी'मुळे लोकशाही धोक्यात; पंतप्रधान मोदींवर काँग्रेसचा हल्लाबोल

‘नोटाबंदी’ने देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली, तर ‘व्होटचोरी’मुळे देशाची राजकीय व्यवस्था नष्ट होत आहे. या दोन्ही गोष्टींत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योगदान असल्याची टीका काँग्रेसने रविवारी केली.

Swapnil S

नवी दिल्ली : ‘नोटाबंदी’ने देशाची अर्थव्यवस्था उद्ध्वस्त केली, तर ‘व्होटचोरी’मुळे देशाची राजकीय व्यवस्था नष्ट होत आहे. या दोन्ही गोष्टींत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे योगदान असल्याची टीका काँग्रेसने रविवारी केली. काँग्रेसचे सरचिटणीस जयराम रमेश यांनी एका प्रसारमाध्यमातील वृत्ताचा स्क्रीनशॉट समाजमाध्यमांवर शेअर केला आहे. २०१६ मधील ‘नोटाबंदी हा मोठा आर्थिक अनर्थ ठरला होता आणि दहा वर्षांनंतरही हा निर्णय पूर्णपणे अपयशी ठरल्याचे या वृत्तात म्हटले होते. या वृत्ताचा संदर्भ देत काँग्रेसने मोदींवर टीका केली आहे.

यापूर्वीही काँग्रेसने ‘नोटबंदी’ला ‘ऐतिहासिक घोडचूक’ म्हटले होते. मोदी सरकारने नोटबंदीमागे वेळोवेळी बदललेली जी उद्दिष्टे मांडली होती, त्यापैकी एकही उद्दिष्ट साध्य झाले नसल्याचा आरोपही विरोधी पक्षाने केला आहे.

जनता माफ करणार नाही

पंतप्रधान मोदी यांनी ८ नोव्हेंबर २०१६ रोजी ५०० आणि १,००० रुपयांच्या नोटा चलनातून बाद करण्याची घोषणा केली होती. नोटाबंदीच्या प्रत्येक वर्धापनदिनी मोदी सरकारवर काँग्रेस टीका करीत आहे. सरकारचा हा अविचारी निर्णय भारतीय अर्थव्यवस्थेसाठी मोठा धक्का ठरला आहे. जनता पंतप्रधानांना माफ करणार नाही, असे काँग्रेसने म्हटले आहे.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'गोकुळवर्चस्वा'चा आज फैसला; संघर्ष मोर्चात ८० हजार कोल्हापूरकर सहभागी, शासननियुक्त ४ संचालकांना मतदानाचा अधिकार

'रॉकेटबाजी'वर बंदी! आकाशात उडणारे फटाके फोडण्यास मनाई; गच्ची, गॅलरी, झोपडपट्ट्यांसह सार्वजनिक, खासगी ठिकाणी निर्बंध

Mumbai : जुहूमध्ये फटाक्यांच्या वादातून तरुणाची हत्या

भीषण आगीत सहा जणांचा मृत्यू; धाराशिवमध्ये दुकानाला लागलेल्या आगीत कुटुंबातील एकमेव बचावला

IND vs NZ 3rd ODI: पाडव्याला पावसाचे पारडे जड! भारताचा आज हॅमिल्टन येथे न्यूझीलंडविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना