राष्ट्रीय

टायगर जिंदा है - जयराम रमेश ; २००४ च्या इतिहासाच्या पुनरावृत्तीची काँग्रेसला अपेक्षा!

निवडणुकीची तयारी कशी हाताळली जाईल याविषयी रमेश म्हणाले की, पक्षाची संघटना तयार आहे आणि राहुल गांधी यात्रेत व्यस्त असूनही प्रचाराचा भाग असतील.

Swapnil S

इंफाळ : काँग्रेसचे ज्येष्ठ नेते जयराम रमेश यांनी २०२४ च्या निवडणुकीचे निकाल हे आधीच ठरलेले आहेत असा भाजपचा दावा फेटाळून लावला आहे आणि "टायगर जिंदा है" असे म्हटले आहे. विरोधी गट २००४ च्या इतिहासाची पुनरावृत्ती करेल जेव्हा भगवा पक्ष 'शायनिंग इंडिया' असूनही सत्तेपासून दूर होता, याचीही आठवण त्यांनी करून दिली आहे.

जयराम रमेश यांनी एका मुलाखतीत भाजपचे दावे फेटाळून ठामपणे सांगितले की केवळ एक मजबूत काँग्रेसच मजबूत विरोधी पक्षाची खात्री देऊ शकते आणि 'भारत जोडो न्याय यात्रा' हा जुन्या पक्षाला मजबूत करण्याचा प्रयत्न आहे. पूर्व ते पश्चिम यात्रेचे व्यवस्थापन करताना पक्षाकडून

निवडणुकीची तयारी कशी हाताळली जाईल याविषयी रमेश म्हणाले की, पक्षाची संघटना तयार आहे आणि राहुल गांधी यात्रेत व्यस्त असूनही प्रचाराचा भाग असतील. निवडणूक सुरू होण्याच्या वेळेपर्यंत यात्रा संपेल. मला अपेक्षा आहे की निवडणुका कुठेतरी सुरू होतील, कदाचित एप्रिलच्या पहिल्या आठवड्यात यात्रा संपली असेल. झूमवर सभा केव्हाही होऊ शकतात. राहुल गांधी यांची ही यात्रा ६७०० किलोमीटरची असून त्यामुळे निवडणुकीच्या तयारीला अडथळा येऊ शकेल यासंबंधात त्यांनी खंडन करीत ही समस्या असेल असे वाटत नाही, असे सांगितले. रमेश म्हणाले की, 'अमृत काल'च्या स्वप्नापेक्षा गेल्या १० वर्षातील 'अन्याय काळा’ने लोक अधिक प्रभावित होतील. "अमृत काळ हे एक स्वप्न आहे, अन्याय काळ एक दुःस्वप्न आहे, असेही ते पुढे म्हणाले.

माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट: HC कडूनही झटका; तातडीने सुनावणी घेण्यास नकार, कधीही होऊ शकते अटक

दादर स्थानकात बदलापूर-CSMT एसी लोकलचे दरवाजेच उघडले नाही; प्रवाशांचा संताप, मोटरमनला जाब - Video व्हायरल

मी माफी का मागू?... ‘ऑपरेशन सिंदूर’बाबतच्या 'त्या' वक्तव्यावर पृथ्वीराज चव्हाण यांचा माफी मागण्यास नकार

शिल्पा शेट्टी-राज कुंद्राच्या अडचणी वाढल्या; ६० कोटींच्या फसवणूक प्रकरणात EOW कडून मोठा धक्का

Ambernath : भाजप उमेदवारांच्या कार्यालयावर गोळीबार; परिसरात तणाव, सुरक्षा रक्षक जखमी - CCTV व्हिडिओ समोर