काँग्रेसचे १७ जूनला देशव्यापी आंदोलन संग्रहित छायाचित्र
राष्ट्रीय

काँग्रेसचे १७ जूनला देशव्यापी आंदोलन

विविध परीक्षांमधील पेपरफुटी आणि गैरव्यवहारांविरोधात काँग्रेस पक्षाने शनिवारी पहिल्या टप्प्यातील देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : विविध परीक्षांमधील पेपरफुटी आणि गैरव्यवहारांविरोधात काँग्रेस पक्षाने शनिवारी पहिल्या टप्प्यातील देशव्यापी आंदोलनाची घोषणा केली आहे. काँग्रेसचे नेते आणि लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी १७ जून रोजी राजस्थानमधील कोटा येथून 'विद्यार्थी अधिवेशनां'च्या माध्यमातून या आंदोलनाची सुरुवात करणार आहेत.

ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस के. सी. वेणुगोपाल यांनी एका निवेदनाद्वारे या आंदोलनाची माहिती दिली. देशातील तरुणांच्या भविष्याशी खेळणाऱ्या पेपर फुटीच्या घोटाळ्यांवर संसदेत सर्वसमावेशक चर्चा घडवून आणणे आणि विद्यार्थ्यांचे हक्क व हित जपण्यासाठी कायदेशीर पावले उचलण्याची मागणी करणे हा या आंदोलनाचा मुख्य उद्देश असल्याचे त्यांनी सांगितले. कोट्यापासून दिल्लीपर्यंत विद्यार्थ्यांच्या मेळाव्यात - तरुणांचे प्रश्न सातत्याने लावून धरणारे नेते राहुल गांधी या आंदोलनादरम्यान देशातील प्रमुख शैक्षणिक आणि कोचिंग हबमध्ये विद्यार्थ्यांशी थेट संवाद साधणार आहेत.

दौऱ्याचे वेळापत्रक

या दौऱ्याचे वेळापत्रक १७ जून कोटा (राजस्थान), १० जुलै अलाहाबाद (उत्तर प्रदेश), ११ जुलै पाटणा (बिहार), १४ जुलै दिल्ली असे आहे. या अधिवेशनांमध्ये विद्यार्थी, स्पर्धा परीक्षांचे उमेदवार, विविध युवा संघटना, शिक्षणतज्ज्ञ आणि पेपर फुटीमुळे थेट फटका बसलेले लाखो तरुण एकत्र येणार आहेत. हा लढा केवळ राजकीय - न ठेवता, सर्वसामान्य विद्यार्थ्यांना यात जोडण्यासाठी - काँग्रेसची विद्यार्थी संघटना 'एनएसयूआय', युथ काँग्रेस आणि सर्व राज्यांतील स्थानिक कमिट्या मोठ्या प्रमाणावर सक्रिय होणार आहेत.

मुख्य मागण्या

काँग्रेसने या आंदोलनाच्या माध्यमातून मोदी सरकारसमोर प्रमुख मागण्या ठेवल्या आहेत. नीट परीक्षेचे आयोजन केंद्रीय स्तरावरून न करता त्याचे विकेंद्रीकरण करण्यात यावे. विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क पूर्णपणे रद्द करण्यात यावे, पेपरफुटीच्या रॅकेटमध्ये सामील असलेल्यांवर कठोर कायदेशीर बडगा उगारण्यात यावा, या संपूर्ण घोटाळ्याची नैतिक जबाबदारी स्वीकारून केंद्रीय शिक्षणमंत्र्यांनी तात्काळ राजीनामा द्यावा, आदी मागण्या करण्यात आल्या आहेत.

आंदोलन सुरू राहणार

कोचिंग सेंटर्स, विद्यापीठे आणि शाळांमध्ये जाऊन विद्यार्थ्यांशी थेट संपर्क साधला जाईल. तसेच डिजिटल आमंत्रणे, सोशल मीडिया मोहिमा आणि थेट प्रक्षेपणाच्या माध्यमातून हा आवाज देशाच्या कानाकोपऱ्यात पोहोचवला जाईल, असे वेणुगोपाल यांनी स्पष्ट केले. काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांच्या मार्गदर्शनाखाली काही दिवसांपूर्वीच पक्षाच्या सरचिटणीसांची आणि प्रदेशाध्यक्षांची एक महत्त्वाची बैठक पार पडली होती.

Mumbai : मध्य रेल्वेच्या मुख्य मार्गावर मध्यरात्रीचा ब्लॉक; हार्बर मार्गावर रविवारी दिवसाचा मेगाब्लॉक

Mumbai : एअर इंडिया इमारतीला मिळणार नवी झळाळी; नूतनीकरणासाठी १८१ कोटी मंजूर

अविश्वास ठरावासाठी दोन तृतीयांश बहुमत आवश्यकच; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा, गृहनिर्माण संस्थेच्या अध्यक्षाला दिलासा

कॉमेडियन प्रणित मोरेच्या अडचणींत वाढ; 'विनोदाच्या नादात विकृती केल्यास थेट कारवाई', गृहराज्यमंत्री पंकज भोयर यांचा इशारा

Mumbai : ब्रेक, स्टेअरिंग नीट हाताळा! दुचाकीस्वारांना क्रॉस करू नका! सुमारे ७ हजारांहून अधिक चालकांचे 'बेस्ट काऊन्सलिंग'