राष्ट्रीय

विम्याच्या रक्कमेसाठी मुलाच्या मृत्यूचे षडयंत्र; दिल्ली पोलिसांकडून कट उघड

विमा कंपनीकडून विम्याची रक्कम हडप करण्यासाठी एका पिता-पुत्राने मोठा कट रचला होता. मात्र, पोलिसांना संशय आल्यामुळे विमा फसवणुकीची घटना उघडकीस आली.

Swapnil S

नवी दिल्ली : विमा कंपनीकडून विम्याची रक्कम हडप करण्यासाठी एका पिता-पुत्राने मोठा कट रचला होता. मात्र, पोलिसांना संशय आल्यामुळे विमा फसवणुकीची घटना उघडकीस आली. वडील आणि मुलगा आदी दोघांनी मिळून १ कोटी रुपयांचा विम्यासाठी मुलाच्या मृत्यूचं षडयंत्र रचले. यासाठी एका वकिलानेही मदत केली. मात्र, पोलिसांमुळे ही घटना उघडकीस आली आणि सर्व प्रकार समोर आल्यानंतर अनेकांना मोठा धक्का बसला.

दिल्लीतील एका व्यक्तीने काही महिन्यांपूर्वी आपल्या मुलासाठी १ कोटी रुपयांची विमा पॉलिसी खरेदी केली होती. मात्र, यानंतर ५ मार्च रोजी या मुलाच्या कुटुंबाने दावा केला की गगनचा (मुलाचा) नजफगडमध्ये रस्ते अपघात झाला. अपघातानंतर एका छोट्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र, उपचारादरम्यान मुलाचा मृत्यू झाला. तसेच हे सर्व खरे वाटावे म्हणून मुलाच्या वडिलांनी मुलाचे अंत्यसंस्कार केले होते.

दरम्यान, या प्रकरणाने ११ मार्च रोजी एका व्यक्तीने या प्रकाराबाबत नजफगड पोलीस ठाण्यात जाऊन तक्रार दाखल केली. यानंतर पोलिसांनी तपास सुरु केला, तेव्हा अपघात झाला की नाही याची चौकशी पोलिसांनी केली. मात्र, अपघाताबाबत पोलिसांना कोणतेही पुरावे आढळून आले नाही. तसेच संबंधित कुटुंबाने केलेल्या दाव्याबाबतही कोणतेही ठोस पुरावे आढळले नाही. यानंतर पोलिसांना संशय आला आणि पोलिसांनी तपासाची चक्र फिरवली.

या घटनेतील मुलाच्या वडिलांनी काही दिवसांपूर्वी मुलासाठी १ कोटी रुपयांची पॉलिसी खरेदी केली होती. हीच १ कोटी रुपयांची विम्याची रक्कम हडप करण्यासाठी वडील आणि मुलाने मिळून हा सर्व बनाव रचला होता अशी माहिती पोलिसांनी केलेल्या तपासात समोर आली. एवढंच नाही तर वकिलांच्या सल्यानुसार हा कट रचल्याचंही समोर आले.

Video : नोएडात ई-बाईक चार्जिंगवेळी भीषण आग; दोघांचा गुदमरून मृत्यू, ५० कुटुंबांची सुटका

Mumbai : कोस्टल रोडवरील बोगद्यात धावत्या कारला आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांची धावपळ, वाहतूक विस्कळीत, Video

Mumbai : कौटुंबिक वादातून पत्नीची निर्घृण हत्या; ओशिवरा पोलीस ठाण्याच्या शेजारीच थरार

माळशेज घाटात सोसाट्याचा वारा; दुचाकीही डगमगली, VIDEO पाहून नेटकरी थक्क

RailOne वरून तिकीट बुक करता? जाणून घ्या महत्त्वाचा नियम, नाहीतर भरावा लागू शकतो दंड