राष्ट्रीय

पेटीएम ॲपचे यूपीआय ऑपरेशन सुरू ठेवा; रिझर्व्ह बँकेची एनपीसीआयला सूचना

पेटीएम ब्रँडची मालकी असलेल्या वन ९७ कम्युनिकेशन लिमिटेड (ओसीएल)ने ही विनंती केली आहे

Swapnil S

मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने शुक्रवारी सांगितले की, पेटीएम ॲपचे यूपीआय ऑपरेशन्स सुरू ठेवण्यासाठी एनपीसीआयला थर्ड पार्टी ॲप्लिकेशन प्रोव्हायड करण्यासाठी मदत करता येईल हे तपासण्यास सांगितले आहे.

रिझर्व्ह बँकेने पेटीएम पेमेंट्स बँकेला १५ मार्च २०२४ नंतर त्यांच्या ग्राहकांच्या खात्यांमध्ये आणि वॉलेटमध्ये आणखी क्रेडिट स्वीकारण्यास मनाई केली आहे. पेटीएम पेमेंट्स बँकेद्वारे संचालित '@paytm' हँडल वापरून यूपीआय ग्राहकांद्वारे अखंड डिजिटल पेमेंट करण्याच्या उद्देशाने आरबीआयने म्हटले आहे की, त्यांनी नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (एनपीसीआय) ला पेटीएम ॲपच्या यूपीआय ऑपरेशनसाठी यूपीआय चॅनेलसाठी (TPAP) थर्ड पार्टी प्रोव्हायडर बनण्यासाठी तपासण्यास सांगितले आहे.

पेटीएम ब्रँडची मालकी असलेल्या वन ९७ कम्युनिकेशन लिमिटेड (ओसीएल)ने ही विनंती केली आहे, असे आरबीआयने एका निवेदनात म्हटले आहे. पेटीएम हँडलचे इतर बँकांमध्ये हस्तांतरण करण्यासाठी, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) ने म्हटले आहे की एनपीसीआय उच्च व्हॉल्यूम यूपीआय व्यवहारांवर प्रक्रिया करण्यासाठी प्रात्यक्षिक क्षमता असलेल्या पेमेंट सर्व्हिस प्रोव्हायडर (पीएसपी) बँका म्हणून ४-५ बँकांची प्रक्रिया सुलभ करू शकते.

'मुरासू' चक्रीवादळाचा धोका वाढला; चेन्नईत शाळा-कॉलेजला सुट्टी; आंध्रला रेड अलर्ट, महाराष्ट्रातही पावसाचा इशारा

Thane : येऊरमध्ये ‘हॅलोविन पार्टी’वर पोलिसांची धाड; ७० हून अधिक तरुण-तरुणी उपस्थित, मद्यपान आणि प्रतिबंधित ई-सिगारेटचा वापर

Mumbai : सहा मजली इमारत, सांस्कृतिक दालन, व्यायामशाळा, प्रशस्त सभागृह; नवीन पालिका सभागृहात आसन क्षमता १०० ने वाढणार

भारताची पहिली बुलेट ट्रेन आकाराला येतेय; ५५७ प्रवासी क्षमता; ताशी २४९ किमी वेग, बेंगळुरूच्या कारखान्यात बीईएमएलकडून ८ डब्यांची ट्रेन

Pankaja Munde Ramp Walk : मंत्री पंकजा मुंडेंचा हटके अंदाज; हॅण्डलूम साडीतील रॅम्प वॉक चर्चेत, Video