दिल्लीत आंदोलनांवरून न्यायालयाची नाराजी 
राष्ट्रीय

दिल्लीत आंदोलनांवरून न्यायालयाची नाराजी

दिल्लीच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जंतरमंतर या परिसराला आंदोलने आणि निदर्शनांसाठी निश्चित जागा म्हणून कायम ठेवण्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केले.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्लीच्या मध्यवर्ती भागात असलेल्या जंतरमंतर या परिसराला आंदोलने आणि निदर्शनांसाठी निश्चित जागा म्हणून कायम ठेवण्यावर दिल्ली उच्च न्यायालयाने शुक्रवारी प्रश्नचिन्ह उपस्थित केले. देशाच्या राजधानीत होणाऱ्या अशा आंदोलनांमुळे संपूर्ण शहराला नाहक ओलीस का ठेवावे, असा उद्विग्न सवाल न्यायालयाने केला आहे.

या प्रकरणी टिप्पणी करताना न्या. अमित महाजन म्हणाले, माझ्या मते, शहराच्या मुख्य भागात अशा प्रकारची आंदोलने किंवा निदर्शने व्हायला नकोत. मात्र, हा निर्णय अखेर सरकारचा आहे. शहराला अशा प्रकारे विनाकारण का वेठीस धरले जावे.

'ऑल इंडिया दलित ख्रिश्चन राइट्स प्रोटेक्शन कमिटी'ने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयात सुनावणी सुरू होती. १० ऑगस्ट रोजी सकाळी १० ते दुपारी १ या वेळेत जंतरमंतरवर शांततापूर्ण आंदोलन करण्याची परवानगी मिळावी, यासाठी संस्थेने दिल्ली पोलिसांकडे अर्ज केला होता. त्यावर लवकरात लवकर निर्णय घेण्याचे निर्देश पोलिसांना द्यावेत, अशी मागणी याचिकेत करण्यात आली होती.

याचिकाकर्त्यांच्या ज्येष्ठ वकिलांनी न्यायालयाला सांगितले की, ९ जुलै रोजी अर्ज करूनही दिल्ली पोलिसांनी त्यावर अजून कोणताही निर्णय घेतलेला नाही. यावर न्या. महाजन यांनी, वैयक्तिकदृष्ट्या सांगायचे तर, शहराच्या आत आंदोलने का व्हावीत, अशी टिप्पणी केली. कायदा आणि सुव्यवस्था राखणे हे पोलिसांचे काम असल्याचे नमूद करत न्यायालयातर्फे पोलिसांना याचिकाकर्त्यांच्या अर्जावर शनिवारी निर्णय घेण्याचे आदेश देण्यात आले. न्यायाधीशांनी स्पष्ट केले की, ते आंदोलनाला परवानगी द्यावी किंवा नाकारावी याबाबत कोणताही आदेश देत नाहीत, परंतु प्राधिकरणाने आपला निर्णय याचिकाकर्त्यांना त्वरित कळवावा.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

'फ्लायदुबई'च्या विमानात थरार; मुंबईकर कॅप्टन स्मित मच्छार ठरला देवदूत, जखमी होऊनही वाचवला १७४ प्रवाशांचा जीव

कचरा टाकाल तर दंड भराल! मुंबईत २८ दिवसांत १,३३६ जणांवर कारवाई; १८ लाख ७० हजारांचा दंड वसूल

CNG Price Hike : मुंबईकरांना महिन्याच्या पहिल्याच दिवशी झटका! CNG महागला; आजपासून मोजावे लागणार जास्त पैसे

२५ सेकंदात घराबाहेरून विद्यार्थिनीला उचललं? अपहरण प्रकरणाला आता वेगळंच वळण; तरुणीने स्वतःच व्हिडिओद्वारे केला खुलासा

Mumbai : उद्यापासून डिजिहेल्थ कनेक्ट अभियान राबवणार; १०० दिवसांत अधिकाधिक नागरिकांचे आभा कार्ड तयार करण्याचे उद्दिष्ट