दत्तात्रेय होसबळे यांनी केले 'एसआयआर'चे समर्थन 
राष्ट्रीय

दत्तात्रेय होसबळे यांनी केले 'एसआयआर'चे समर्थन

देशातील काही अंतर्गत आणि बाह्य "अराजक शक्ती" तरुणांना भडकवत आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक दत्तात्रेय होसबळे यांनी बुधवारी केला. राजवट बदलाच्या नावाखाली समाजात हिंसाचार किंवा अशांतता पसरवणे देशाच्या हिताचे नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे.

Swapnil S

इंदूर : देशातील काही अंतर्गत आणि बाह्य "अराजक शक्ती" तरुणांना भडकवत आहेत, असा गंभीर आरोप राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक दत्तात्रेय होसबळे यांनी बुधवारी केला. राजवट बदलाच्या नावाखाली समाजात हिंसाचार किंवा अशांतता पसरवणे देशाच्या हिताचे नाही, असा स्पष्ट इशारा त्यांनी दिला आहे. इंदूर येथे आरएसएसच्या अखिल भारतीय कार्यकारी मंडळाच्या वार्षिक बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

मतदारयाद्यांच्या विशेष कसून पुनरीक्षणाचे समर्थन करताना होसबळे म्हणाले की, त्रुटीरहित मतदारयाद्या तयार करण्यासाठी हे अत्यंत आवश्यक आहे. विरोधकांनी या मुद्द्यावर विनाकारण विरोध दर्शवण्यापूर्वी संपूर्ण प्रकरणाचा अभ्यास केला पाहिजे. मतदारयाद्यांमधून वगळण्यात आलेले अनेकजण मृत पावलेले किंवा दोन ठिकाणी नोंदणी झालेले होते. तसेच, भारतीय नागरिक नसलेल्या लोकांची नावे मतदारयाद्यांमध्ये समाविष्ट करणे हे देशाच्या आर्थिक आणि सामाजिक सुरक्षेसाठी घातक आहे, असे ते म्हणाले. यापूर्वीही अशा प्रकारची पुनरावृत्ती झाली असल्याचे त्यांनी नमूद केले.

'जेन-झी आंदोलनावर चिंता

दिल्लीतील जंतरमंतरवरील अलीकडील 'जेन झी आंदोलनाबाबत म्हणाले की, देशांतर्गत आणि बाह्य स्वरूपातील काही अराजक शक्ती तरुणांना भडकवण्याचा कट रचत आहेत. मात्र, कोणत्याही समाजाने आणि सरकारने तरुणांच्या आकांक्षा व समस्यांकडे लक्ष दिले पाहिजे. तरुणांशी संवादाची भूमिका संघ घेत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. लोकशाही व्यवस्थेत सरकार बदलण्याची प्रक्रिया केवळ निवडणुकांद्वारे होते, असे सांगत राजवट बदलाच्या नावाखाली अशांतता किंवा भेदभाव निर्माण करणे समाजाच्या हिताचे नाही, असेही ते म्हणाले.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

दिवाळीत गावी जाणं महागलं! खासगी बसच्या तिकीट दरांत थेट दुप्पट-तिप्पट वाढ, प्रवासी संतापले

'ते' कायदे आता कालबाह्य - सर्वोच्च न्यायालय

फटाके फोडण्याच्या वेळा ठरवा; उच्च न्यायालयाचे राज्य सरकारला निर्देश

'गोकुळ'साठी डाव! सहकार कायद्यात दुरुस्ती; सरकारकडून पाच सदस्यांची नियुक्ती

फॉर्म ६, घोषणापत्र आता वेगवेगळे