दिल्ली स्फोटप्रकरणी आणखी एकाला अटक; आतापर्यंत ७ जणांना अटक 
राष्ट्रीय

दिल्ली स्फोटप्रकरणी आणखी एकाला अटक; आतापर्यंत ७ जणांना अटक

दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणची चौकशी करत असलेल्या राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या आणि त्यांना विविध सुविधा पुरवणाऱ्या एकाला अटक केली आहे. सोयब असे त्याचे नाव असून, दहशतवादी उमर ऊन नबी याला हल्ल्यापूर्वी त्यानेच आश्रय देण्याबरोबरच अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या, अशी माहिती तपासात समोर आली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणची चौकशी करत असलेल्या राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) दहशतवाद्यांना आश्रय देणाऱ्या आणि त्यांना विविध सुविधा पुरवणाऱ्या एकाला अटक केली आहे. सोयब असे त्याचे नाव असून, दहशतवादी उमर ऊन नबी याला हल्ल्यापूर्वी त्यानेच आश्रय देण्याबरोबरच अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या होत्या, अशी माहिती तपासात समोर आली आहे. या प्रकरणात फरार असलेल्या मदतनीस आरोपीला ‘एनआयए’ने जेरबंद केले असून त्याची ओळख सोयब अशी झाली आहे. तो हरयाणातील फरीदाबादच्या धौज परिसराचा रहिवासी आहे. तपासाशी संबंधित सूत्रांच्या माहितीनुसार, सोयबने मुख्य आरोपी दहशतवादी उमर उन नबी याला स्फोटापूर्वी आश्रय दिला होता. तसेच त्याला अन्य सुविधाही पुरविल्या होत्या.

सोयबने केलेल्या मदतीमुळेच दहशतवादी उमर उन नबी अडथळ्याविना आपला घातक कट राबवू शकला. ‘एनआयए’चे पथक आता सोयबची सखोल चौकशी करत आहे, ज्यामधून या नेटवर्कमधील इतर सदस्यांविषयी तसेच स्फोटामागील संपूर्ण कटाचा उलगडा होण्याची शक्यता आहे.

आतापर्यंत ७ जणांना अटक

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ १० नोव्हेंबरला झालेल्या कार बॉम्बस्फोट प्रकरणात ‘एनआयए’ने आतापर्यंत सात जणांना अटक केली आहे. सोयबने दहशतवादी उमरच्या राहण्याची सोय, हालचालीसाठी मदत तसेच इतर अनेक सुविधा सुविधा पुरवल्या होत्या. यापूर्वीही तपास यंत्रणांनी या प्रकरणात आतापर्यंत सात ७ जणांना अटक केली असून ते सर्वजण उमरचे सहकारी असल्याचे निष्पन्न झाले आहे.

मुंबईत १ लाख झाडे लावण्याचा संकल्पच महापौर रितू तावडे यांच्याकडून हरित मुंबई अभियानाला गती

Navi Mumbai : पाणी बचतीसाठी कठोर उपाययोजना; अपव्यय करणाऱ्यांवर कारवाईचा इशारा; वॉशिंग सेंटर, स्विमिंग पूल बंदचे आदेश

'नहीं बोलूंगा मराठी!'; मुंबई सेंट्रल स्थानकावरील चौकशी कक्षात रेल्वे कर्मचाऱ्याची अरेरावी, VIDEO व्हायरल

Ambernath : घरात CCTV लावून ठेवायचा पाळत; लग्नानंतर ४८ दिवसांत विवाहितेची आत्महत्या; डॉक्टर पतीसह तिघांना अटक

मुंबईकरांच्या लोकल प्रवासाला गती मिळणार; प्रकल्पांसाठी 'एमआरव्हीसी'ला हवेत ६४,६४४ कोटी