अरविंद केजरीवाल, प्रशांत भूषण (डावीकडूुन)
राष्ट्रीय

‘आप’च्या पराभवाला केजरीवालच जबाबदार! प्रशांत भूषण यांची टीका

दिल्ली विधानसभेतील पराभवाला अरविंद केजरीवाल हेच जबाबदार आहेत, अशी टीका ‘आप’चे सहसंस्थापक प्रशांत भूषण यांनी केली.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभेतील पराभवाला अरविंद केजरीवाल हेच जबाबदार आहेत, अशी टीका ‘आप’चे सहसंस्थापक प्रशांत भूषण यांनी केली. भूषण म्हणाले की, केजरीवाल यांनी ‘आप’ला एकाच व्यक्तीचे वर्चस्व असलेला आणि सर्वात भ्रष्ट पक्ष बनविला. केजरीवाल यांनी स्वतःसाठी शीशमहाल बांधला आणि ते आलिशान गाड्यातून प्रवास करत असत. प्रस्थापित पक्षांना पर्याय देण्यासाठी ‘आप’ची स्थापना करण्यात आली होती. मात्र, पक्षाची कार्यपद्धती पारदर्शक, जबाबदार आणि लोकशाहीवर आधारित न ठेवता केजरीवाल यांनी पक्षाला स्वतःच्या नियंत्रणाखाली ठेवले. त्यांनी पक्षाला अपारदर्शक आणि भ्रष्ट स्वरुपात रूपांतरित केले. ज्यांनी लोकपालची मागणी केली होती, त्यांनीच लोकपाल काढून टाकला, असे भूषण म्हणाले.

केजरीवाल यांनी स्वतःसाठी ४५ कोटींचा शीशमहाल बांधला. ‘आप’ने स्थापन केलेल्या तज्ज्ञ समित्यांचे ३३ तपशीलवार अहवाल त्यांनी रद्द केले. वेळ आली की, पक्ष सोयीस्कर धोरण स्वीकारेल. त्यांना वाटते की, केवळ प्रचार आणि भाषणबाजीने राजकारण करता येते. ही ‘आप’च्या शेवटाची सुरुवात आहे, असे त्यांनी सांगितले.

समुद्रातील मासेमारीला लहान बोटी मुकणार; शासनाच्या निर्णयाला मच्छीमार कृती समितीचा विरोध

कामगारांच्या कामाचे तास वाढणार नाहीत; कामगार मंत्री आकाश फुंडकर यांच्याकडून स्पष्टीकरण

मुंबईत घुसले १४ दहशतवादी, ३४ वाहनांमध्ये मानवी बॉम्बस्फोट घडवणार; अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांना धमकी

Mumbai : लालबागच्या राजाचे अंतिम दर्शन घ्यायचे आहे? मग 'या' मार्गावर द्या बाप्पाला शेवटचा निरोप!

“शशी थरूर यांना स्पर्धक मिळाला”; पंजाबच्या महापुराबाबत पठ्ठ्याचं तोडकं-मोडकं इंग्रजी ऐकून नेटकरी लोटपोट, Video व्हायरल