@ANI
@ANI
राष्ट्रीय

'अग्निपथ' योजनेविरोधात दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळल्या सर्व याचिका; केंद्र सरकारला दिलासा

प्रतिनिधी

दिल्ली उच्च न्यायालयाने सोमवारी अग्निपथ भरती योजनेविरोधात असलेल्या सर्व याचिका फेटाळून लावल्या आहेत. यामुळे केंद्र सरकारला मोठा दिलासा मिळाला आहे. यावेळी न्यायालयाने म्हंटले आहे की, या प्रकरणात दखल घेण्यासारखे कोणतेही कारण दिसत नाही. या योजनेचे उद्देश देशाच्या सैन्याला उत्तम पद्धतीने तयार करणे, हे आहे आणि ते देशाच्या हिताचे असे मत न्यायालायने याचिका फेटाळताना म्हंटले आहे. तसेच, जुन्या धोरणाच्या आधारे नियुक्तीची याचिका फेटाळत ही मागणी न्याय्य नसल्याचे सांगितले आहे.

अग्निपथ भरती योजनेला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयाने दिल्ली उच्च न्यायालयात हस्तांतरित करण्याचे निर्देश दिले होते. तसेच उच्चं न्यायालयाने या याचिका लवकरात लवकर निकालात काढाव्यात, असे आदेशही सर्वोच्च न्यायालयाने दिले होते.

'त्या' कंपनीचे अजून ८ बेकायदा होर्डिंग्ज, BMC ची रेल्वेला नोटीस; पालिकेने होर्डिंग हटवल्यास खर्च रेल्वेकडून वसूल करणार

३० होर्डिंग्जचे नूतनीकरण स्थगित: स्ट्रक्चरल स्टॅबिलिटी प्रमाणपत्र सादर न केल्याने दणका

पुणे-मुंबई एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या दीड तासांचा ब्लॉक, 'या' वेळेत वाहतूक राहणार बंद

मध्य रेल्वे मार्गावर रविवारी ब्लॉक; पश्चिम रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा

येत्या आठवड्यात बारावीचा निकाल