Delhi Crime : कॅफेतील पार्टीनंतर सहकाऱ्यांकडून सामूहिक अत्याचार; २२ वर्षीय तरुणीचा आरोप, दोन महिलांसह तिघे गजाआड (Photo-X)
राष्ट्रीय

Delhi Crime : कॅफेतील पार्टीनंतर सहकाऱ्यांकडून सामूहिक अत्याचार; २२ वर्षीय तरुणीचा आरोप, दोन महिलांसह तिघे गजाआड

प्रीत विहार परिसरातील कॅफे रात्री ११.३० वाजता बंद झाला होता. मात्र, एका कर्मचाऱ्याकडे कॅफेची चावी होती. त्याने ही चावी वापरून कॅफे पुन्हा उघडला अन्...

किशोरी घायवट-उबाळे

नवी दिल्ली : देशाची राजधानी दिल्लीतून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. कॅफेमधील पार्टी संपल्यानंतर २२ वर्षीय तरुणीवर दोन पुरुष सहकाऱ्यांनी सामूहिक अत्याचार केल्याचा आरोप आहे. या घटनेवेळी कॅफेमधील इतर सहकारीही उपस्थित होते. त्यांनी आरोपींना मदत केल्याचा आरोप तरुणीने केला आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोन महिलांसह तिघांना अटक केली असून, अन्य तीन फरार आरोपींचा शोध सुरू आहे.

कॅफे बंद झाल्यानंतरही पहाटेपर्यंत पार्टी

माध्यमांच्या वृत्तानुसार, पूर्व दिल्लीतील प्रीत विहार परिसरातील हा कॅफे रात्री सुमारे ११.३० वाजता बंद झाला होता. मात्र, एका कर्मचाऱ्याकडे कॅफेची चावी होती. त्याने ही चावी वापरून कॅफे पुन्हा उघडल्याचा आरोप आहे. त्यानंतर आठ जणांचा ग्रुप कॅफेमध्येच थांबला.

या ग्रुपमधील आठ जणांनी मद्यपान आणि नाचगाणे करत पार्टी केली. मंगळवारी (दि. २४) पहाटे सुमारे ३.३० वाजेपर्यंत ही पार्टी सुरू होती. याचदरम्यान दोन पुरुष सहकाऱ्यांनी आपल्यावर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप तरुणीने केला आहे.

इतर सहकाऱ्यांनी आरोपींना मदत केल्याचा आरोप

पीडित तरुणीने केलेल्या तक्रारीनुसार, कथित घटना घडली तेव्हा कॅफेमधील इतर सहकारीही तेथे उपस्थित होते. मात्र, त्यांनी तिला मदत करण्याऐवजी आरोपींना साथ दिल्याचा आरोप तरुणीने केला आहे. या प्रकरणातील सर्व आरोपांची पोलीस चौकशी करत आहेत.

सहा जणांविरोधात गुन्हा दाखल

पीडित तरुणी कडकडडूमा येथील क्रॉस रिव्हर मॉलमधील एका कॅफेमध्ये काम करते. या प्रकरणातील आरोपीही त्याच कॅफेमध्ये काम करत असल्याची माहिती समोर आली आहे.

तरुणीच्या तक्रारीनंतर पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या (BNS) संबंधित कलमांनुसार सहा जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यामध्ये चार पुरुष आणि दोन महिलांचा समावेश आहे.

दोन महिलांसह तिघांना अटक

या प्रकरणात पोलिसांनी आतापर्यंत तिघांना अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्यांमध्ये एका पुरुषासह दोन महिलांचा समावेश आहे. अन्य तीन आरोपी अद्याप फरार असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. तरुणीने केलेल्या आरोपांची आणि या घटनेशी संबंधित इतर बाबींची पोलीस पडताळणी करत आहेत.

(इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

BEST चा १,३१७ कोटींचा तुटीचा अर्थसंकल्प मंजूर; ५ हजार गाड्या येण्यावर उत्पन्नवाढीचे नियोजन; पुरवठ्याच्या विलंबावरून सदस्यांचा प्रशासनाला जाब

जवानाच्या निधनानंतरही कुटुंबाशी जपलं नातं; लेकीच्या लग्नात पोहोचली संपूर्ण फौज; पार पाडली वडिलांची जबाबदारी

कांद्याचे दर कोसळले; पाच दिवसांत प्रतिक्विंटल ९१९ रुपयांची घसरण, शेतकऱ्यांमध्ये निराशा

Mumbai : टँकरवर आता 'आयओटी'ची नजर; पाणी वितरणाची दर १५ मिनिटांनी अपडेट मिळणार, ३१ टँकर भरणा केंद्रांवर फ्लो मीटर

नव्या शहाड उड्डाणपुलासाठी हालचालींना वेग; महापौरांनी घेतला प्रकल्पाचा आढावा