'रामलीला'वरून माजणार रण; दिल्ली पोलिसांचा निर्बंधांचा प्रस्ताव, ५० हजार लोकांची मर्यादा 
राष्ट्रीय

'रामलीला'वरून माजणार रण; दिल्ली पोलिसांचा निर्बंधांचा प्रस्ताव, ५० हजार लोकांची मर्यादा

दिल्लीतील रामलीला मैदानावर होणाऱ्या सभा, आंदोलने आणि कार्यक्रमांच्या नियमनासाठी दिल्ली पोलिसांनी नवीन मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा तयार केला आहे. त्यानुसार, या मैदानावरील कार्यक्रमांसाठी लोकांची कमाल मर्यादा ५० हजार निश्चित करण्याचा प्रस्ताव आहे. कार्यक्रमांची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ अशी निश्चित करण्याचीही शिफारस करण्यात आली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्लीतील रामलीला मैदानावर होणाऱ्या सभा, आंदोलने आणि कार्यक्रमांच्या नियमनासाठी दिल्ली पोलिसांनी नवीन मार्गदर्शक तत्त्वांचा मसुदा तयार केला आहे. त्यानुसार, या मैदानावरील कार्यक्रमांसाठी लोकांची कमाल मर्यादा ५० हजार निश्चित करण्याचा प्रस्ताव आहे. कार्यक्रमांची वेळ सकाळी १० ते सायंकाळी ५ अशी निश्चित करण्याचीही शिफारस करण्यात आली आहे. या महत्त्वाच्या ठिकाणी होणारी आंदोलने आणि सार्वजनिक कार्यक्रम सुरक्षिततेच्या तसेच प्रशासकीय नियमांच्या चौकटीत आणणे हा या प्रस्तावाचा उद्देश आहे.

दिल्ली पोलिसांच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, या संदर्भातील मानक कार्यपद्धतीचा (एसओपी) मसुदा मंजुरीसाठी दिल्ली पोलीस मुख्यालयाकडे पाठवला आहे. हा प्रस्ताव सध्या प्राथमिक टप्प्यात असून, त्यातील तरतुदींना अद्याप अंतिम स्वरूप देण्यात आलेले नाही.

प्रस्तावित नियमांनुसार, कार्यक्रम आयोजकांना पोलिसांकडे परवानगी मागण्यापूर्वी संबंधित मैदान उपलब्ध असल्याबाबत दिल्ली महानगरपालिकेची (एमसीडी) परवानगी घ्यावी लागणार आहे. तसेच, प्रस्तावित कार्यक्रमाच्या किमान १० दिवस आधी अर्ज सादर करणे बंधनकारक असेल.

कार्यक्रमाच्या व्यवस्थापनाची जबाबदारी आयोजकांवर सोपवण्यात येणार आहे. यात वाहतूक पोलिसांशी समन्वय, वाहनतळाची व्यवस्था आणि सहभागींसाठी निश्चित केलेली वाहने उभी करण्याच्या ठिकाणांचा समावेश असेल.

....सर्व जबाबदाऱ्या आयोजकांवरच

  • बंदुका, तलवारी, भाले, धारदार वस्तू आणि अन्य प्रतिबंधित वस्तू मैदानात आणण्यास मनाई.

  • मैदानाच्या परिसरात ड्रोन उडवण्यासाठीही पूर्वपरवानगी घेणे आवश्यक.

  • पिण्याचे पाणी, वैद्यकीय मदत, स्वच्छतागृहे आणि कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावण्याची जबाबदारी आयोजकांवरच.

  • रस्ते तसेच आपत्कालीन सेवांसाठीचे मार्ग अडथळामुक्त ठेवण्याची जबाबदारीही आयोजकांवर असेल.

या प्रस्तावाची सक्षम प्राधिकरणाकडून छाननी झाल्यानंतर पुढील कार्यवाही केली जाईल. संबंधित प्राधिकरणांची मंजुरी मिळाल्यानंतरच अंतिम एसओपी (मार्गदर्शक तत्वे) लागू करण्यात येणार आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

IND vs NZ 5th ODI: भारताच्या फलंदाजांचा कस; न्यूझीलंडविरुद्ध आज निर्णायक पाचवा एकदिवसीय सामना

१४ कोटी मतदार अवैध, मग निवडणुका कशा वैध? राहुल गांधी यांचा सवाल

नवा शैक्षणिक वादंग; खासगी विद्यापीठे, स्वायत्त महाविद्यालये शुल्क नियामक प्राधिकरणाच्या कक्षेत? विरोधकांचा आक्षेप, सत्ताधारीही अस्वस्थ

Ind vs Pak U19 Final: आशियावर भारताचेच वर्चस्व; थरारक लढतीत पाकिस्तानवर १ गडी राखून सरशी, मोहित ठरला नायक

Microsoft Global Outage: मायक्रोसॉफ्टची सेवा पूर्ववत