राष्ट्रीय

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे एक व्यक्ती नव्हे, तर विद्यापीठ - उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

फॉर फॉरेन लिटरेचरच्या आवारात लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले

प्रतिनिधी

लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांनी आपल्या आयुष्यात इतके मोठे संस्थात्मक काम केले. त्यामुळे ते केवळ एक व्यक्ती नव्हे, तर विद्यापीठ होते,” असे गौरवोद्गगार महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी काढले.

रशियातील मॉस्को येथे सकाळी मार्गारिटा रुडामिनो ऑल रशिया स्टेट लायब्ररी फॉर फॉरेन लिटरेचरच्या आवारात लोकशाहीर, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या पुतळ्याचे लोकार्पण करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष अ‍ॅड. राहुल नार्वेकर, भारतीय सांस्कृतिक संबंध परिषदेचे अध्यक्ष डॉ. विनय सहस्रबुद्धे, आ. सुनील कांबळे, प्रा. संजय देशपांडे, माजी आ. सुधाकर भालेराव अमित गोरखे हेसुद्धा या कार्यक्रमाला उपस्थित होते.

यावेळी बोलताना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “महाराष्ट्रासाठी, मराठी अस्मितेसाठी आजचा क्षण अतिशय गौरवाचा, अभिमानाचा आहे. वंचित, श्रमिकांचा आवाज आज रशियात बुलंद झाला. साहित्यभूषण, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांचा पुतळ्याचे आज मॉस्कोमध्ये लोकार्पण व्हावे आणि ती संधी मला मिळावी, हा माझ्या आयुष्यातील संस्मरणीय क्षण आहे. लोकशाहीर साहित्यभूषण अण्णाभाऊ साठे यांनी वंचितांसाठी, समाजातील दुर्लक्षितांसाठी मोठे कार्य आपल्या आयुष्यात केले.

Women’s World Cup : ऐतिहासिक विजेतेपदाचे लक्ष्य; भारत-दक्षिण आफ्रिका महिला संघांत आज अंतिम लढत

Mumbai : एल्फिन्स्टन पूलाचे पाडकाम आज रात्रीपासून

Maharashtra Rain : पाऊस सुरूच राहण्याची शक्यता

Satyacha Morcha Mumbai : मविआचा एल्गार; उद्धव, राज, शरद पवार यांच्यासह विरोधकांचे शक्तिप्रदर्शन

Satyacha Morcha : मुंबईत सत्याचा जयघोष! सीएसएमटी स्थानक परिसर घोषणांनी दणाणला; हजारोंच्या संख्येने पक्षांचे कार्यकर्ते सहभागी