नवी दिल्ली : ‘डीजीसीए’ने देशातील सर्व विमान कंपन्यांना बोइंग ७८७ व ७३७ विमानांच्या ‘फ्यूएल स्वीच लॉकिंग’ यंत्रणेची पूर्ण तपासणी करण्याचे आदेश दिले आहेत. ही तपासणी येत्या २१ जुलैपर्यंत अनिवार्यपणे पूर्ण करायची आहे.
प्रवाशांच्या सुरक्षेसाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. काही आंतरराष्ट्रीय वृत्तानुसार, बोइंग ७८७ व ७३७ विमानांचे ‘फ्यूएल स्वीच लॉकिंग’ यंत्रणेत काही तांत्रिक बिघाड उघड झाले आहेत. त्यामुळे सुरक्षेला धोका निर्माण झाला आहे.
‘फ्यूएल स्वीच लॉकिंग’ यंत्रणा ही इंजिनला इंधन पुरवठा नियंत्रित करतो. यात काही बिघाड झाल्यास इंजिन बंद होते किंवा इंधनाचा पुरवठा थांबण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
बोइंग ७८७ व ७३७ विमानांची तपासणी करून त्याचा तांत्रिक अहवाल तत्काळ सोपवावा. विमानात काही बिघाड झाल्यास त्यात सुधारणा करावी, असे ‘डीजीसीए’ने म्हटले आहे.