ANI
राष्ट्रीय

केंद्रीय शिक्षण मंत्र्यांकडून नीट परीक्षा सुरक्षा व्यवस्थेचा आढावा; बनावट टेलिग्राम चॅनेल्सवर कडक कारवाईचे आदेश

आगामी 'नीट-युजी' फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवारी केंद्रीय सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांसोबत एक उच्चस्तरीय बैठक घेत या वैद्यकीय प्रवेश परीक्षेशी संबंधित अफवा आणि चुकीची माहिती पसरवणाऱ्या बनावट टेलिग्राम चॅनेल्सवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले.

Swapnil S

नवी दिल्ली : आगामी 'नीट-युजी' फेरपरीक्षेच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी बुधवारी केंद्रीय सुरक्षा आणि गुप्तचर यंत्रणांसोबत एक उच्चस्तरीय बैठक घेत या वैद्यकीय प्रवेश परीक्षेशी संबंधित अफवा आणि चुकीची माहिती पसरवणाऱ्या बनावट टेलिग्राम चॅनेल्सवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले.

राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात 'नीट' (पदवी) परीक्षा अत्यंत सुरक्षित, पारदर्शक आणि न्याय्य वातावरणात पार पाडण्यासाठी अत्यंत सतर्क राहणे आणि अभेद्य सुरक्षा व्यवस्था तैनात करणे गरजेचे असल्याचे शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केले. केंद्रीय शिक्षण मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी आणि राष्ट्रीय परीक्षा संस्थेचे महासंचालक या बैठकीला उपस्थित होते. परीक्षेदरम्यान कुठे त्रुटी किंवा कमतरता राहू शकते, याचा आगाऊ अंदाज घेऊन वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्याबाबत या बैठकीत सविस्तर चर्चा झाली.

समांतर बैठक

दरम्यान, मेटा, गुगल आणि टेलिग्राम या आघाडीच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सच्या प्रतिनिधींसोबतही एक समांतर बैठक घेण्यात आली. स्पर्धा परीक्षांच्या काळात, विशेषतः टेलिग्राम चॅनेल्स आणि अज्ञात ऑनलाइन ग्रुप्सच्या माध्यमातून पसरवल्या जाणाऱ्या अफवांबद्दल अधिकाऱ्यांनी तीव्र चिंता व्यक्त केली. अनेक बनावट चॅनेल्स परीक्षा जवळ आली की मोठ्या प्रमाणावर सक्रिय होतात. प्रश्नपत्रिका फुटल्याचे खोटे दावे करणे, क्लिकबेट (आकर्षक पण खोटे) मजकूर आणि पडताळणी न केलेली माहिती पसरवून विद्यार्थी व पालकांमध्ये भीतीचे वातावरण तयार केले जाते, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

संघटित यंत्रणा

अनेक लिंक्स युजर्सना ऑटोमेटेड बॉट्स आणि बनावट ग्रुप्सकडे वळवतात, ज्यामुळे ही चुकीची माहिती आणखी वेगाने पसरते. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीनुसार, अनेक संशयास्पद टेलिग्राम चॅनेल्स काही ठरावीक फोन नंबरवरूनच चालवले जात आहेत. धर्मेंद्र प्रधान यांनी परीक्षा सुरू होण्यापूर्वीच अफवा आणि खोटा प्रचार करणारी चॅनेल्स तातडीने ब्लॉक व बंद करण्याचे आदेश दिले आहेत.

CJP आंदोलकाला नोटीस; सरन्यायाधीशांनी दंडाधिकाऱ्यांना फटकारले

विकास प्रकल्पांना गती; 'महाराष्ट्र लँड बँक', 'महाभूमी स्टॅक' प्रणालीचे महसूलमंत्री बावनकुळेंच्या हस्ते लोकार्पण

अणुवीज प्रकल्पात ७९ हजार कोटींची गुंतवणूक

Mumbai : गणेशोत्सवात विद्यापीठाचे दीड हजार ‘सारथी’; NSS चे विद्यार्थी पोलिसांच्या मदतीला

मराठा-मराठा संघर्ष झाल्यास त्याला सर्वस्वी शिंदेच जबाबदार, मनोज जरांगे यांचा इशारा