विद्यार्थ्यांचे हित, देशाच्या एकतेसाठी निर्णय - धर्मेंद्र प्रधान  (Photo-X)
राष्ट्रीय

विद्यार्थ्यांचे हित, देशाच्या एकतेसाठी निर्णय - धर्मेंद्र प्रधान

गेल्या १० दिवसांतील घडामोडींनी आपण अत्यंत व्यथित झालो असून हा प्रश्न आपल्या व्यक्तिगत प्रतिष्ठेचा नाही, असे सांगत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला.

Swapnil S

गेल्या १० दिवसांतील घडामोडींनी आपण अत्यंत व्यथित झालो असून हा प्रश्न आपल्या व्यक्तिगत प्रतिष्ठेचा नाही, असे सांगत केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. परिस्थितीचा गैरफायदा देशविरोधी शक्तींनी घेऊ नये, देशाची एकता अबाधित राहावी, एकाही विद्यार्थ्याचे भविष्य कायदेशीर अडचणींत अडकू नये आणि विद्यार्थ्यांनी आपला वेळ अभ्यासावर व करिअर घडवण्यावर केंद्रित करावा, या उद्देशाने आपण हा निर्णय घेत असल्याचे प्रधान यांनी नमूद केले.

"या सर्व बाबींचा विचार करून मी माझा राजीनामा मा. पंतप्रधानांकडे पाठवला आहे," असे त्यांनी प्रसिद्ध केलेल्या निवेदनात म्हटले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यकाळात सार्वजनिक वादाच्या पार्श्वभूमीवर राजीनामा देणारे प्रधान हे दुसरे केंद्रीय मंत्री ठरले आहेत. यापूर्वी २०१८ मध्ये 'मी-टू' मोहिमेदरम्यान लैंगिक शोषणाचे आरोप झाल्यानंतर परराष्ट्र व्यवहार राज्यमंत्री एम. जे. अकबर यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला होता.

(इंग्रजीत वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

IIT बॉम्बेतील साहिल वाकोडे आत्महत्येप्रकरणी प्राध्यापक निलंबित; 'त्या' निवेदनावरून संस्थेची माफी

Mumbai : ‘बटरफ्लाय’ रोखणार पाणी गळती; जलवाहिन्यांवर बटरफ्लाय झडपा बसवणार, गणेश खणकर यांच्या मागणीची दखल

Mumbai : चौपाटी, विसर्जनस्थळी चोख व्यवस्थापन; देशभरातील तज्ज्ञांकडून पालिका, पोलिसांचे कौतुक

गणेश विसर्जनासाठी BMC सज्ज; ३८३ कृत्रिम तलावांची व्यवस्था, ६७ नैसर्गिक विसर्जनस्थळांवरही सुविधा, २५ हजार अधिकारी-कर्मचारी तैनात

बार्सिलोनामध्ये ‘गणपती बाप्पा मोरया’; महाराष्ट्र मंडळ स्पेनतर्फे गणेशोत्सव, स्पॅनिश कलाकारांचाही सहभाग