माल पोहोचल्याची आता डिजिटल नोंद; ई-वे बिल पोर्टलवर सुविधा सुरू 'एआय' ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

माल पोहोचल्याची आता डिजिटल नोंद; ई-वे बिल पोर्टलवर सुविधा सुरू

जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत व्यवसाय आता ज्या मालासाठी ई-वे बिल जनरेट केले होते तो माल नियोजित स्थानी पोहोचल्याची डिजिटल नोंद पोर्टलवर करू शकतात, अशी माहिती जीएसटी नेटवर्कने दिली आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : जीएसटी अंतर्गत नोंदणीकृत व्यवसाय आता ज्या मालासाठी ई-वे बिल जनरेट केले होते तो माल नियोजित स्थानी पोहोचल्याची डिजिटल नोंद पोर्टलवर करू शकतात, अशी माहिती जीएसटी नेटवर्कने दिली आहे.

वस्तू आणि सेवा कराची तांत्रिक प्रणाली सांभाळणाऱ्या 'जीएसटीएन'ने करदात्यांसाठी जारी केलेल्या मार्गदर्शक सूचनेत म्हटले आहे की, माल पोहोचवण्याचे काम पूर्ण झाल्यावर ई-वे बिल बंद करणे शक्य व्हावे यासाठी ई-वे बिल प्रणालीमध्ये ऐच्छिक तत्त्वावर एक नवीन 'ई-वे बिल क्लोजर' सुविधा सुरू करण्यात आली आहे.

आतापर्यंत, ई-वे बिल प्रणाली प्रामुख्याने माल वाहतुकीची सुरुवात आणि वाहतुकीचा मार्ग ट्रॅक करत होती, परंतु माल पोहोचवण्याची प्रक्रिया पूर्ण झाल्याची डिजिटल नोंद करण्यासाठी कोणतीही औपचारिक यंत्रणा नव्हती. या नवीन क्लोजर वैशिष्ट्यामुळे व्यवहाराचा सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा स्पष्ट मागोवा घेता येईल आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील जबाबदारी अधिक मजबूत होईल.

जीएसटी नियमांनुसार, ५०,००० रुपयांपेक्षा जास्त मूल्याचा माल घेऊन जाणाऱ्या व्यक्तीकडे ई-वे बिल असणे आवश्यक आहे. माल वाहतूक सुरू करण्यापूर्वी जीएसटी-नोंदणीकृत व्यक्ती किंवा ट्रान्सपोर्टरने जीएसटी पोर्टलवरून हे दस्तऐवज जनरेट करणे बंधनकारक आहे.

जीएसटीएनने स्पष्ट केले आहे की, संबंधित व्यवहारातील पुरवठादार, माल मिळवणारा, वाहतूकदार किंवा चालक किंवा ज्या अधिकृत व्यक्तीचा मोबाईल क्रमांक क्लोजरसाठी देण्यात आला आहे अशा कोणाकडूनही हे ई-वे बिल बंद केले जाऊ शकते.

नवीन क्लोजर वैशिष्ट्यामुळे व्यवहाराचा सुरुवातीपासून शेवटपर्यंतचा स्पष्ट मागोवा घेता येईल आणि लॉजिस्टिक क्षेत्रातील जबाबदारी अधिक मजबूत होईल.

सामान्य माणसाच्या कल्याणासाठी काम करा; अर्थमंत्री सीतारामन यांचे प्राप्तिकर विभागाला निर्देश

Nashik : भरधाव ट्रक फ्लायओव्हरवरून थेट ५० फूट खाली कोसळला; सिन्नरमधील भीषण अपघाताचा VIDEO व्हायरल

महाराष्ट्रात ८७.७९ टक्के मतदार अर्जांचे वाटप पूर्ण; १ लाखाहून अधिक BLO कडून मतदार याद्यांचे पुनरीक्षण

Mumbai : तीन वर्षांची असताना गिळलं टोपण; टीबी-दमा समजून डॉक्टरांनी ७ वर्षे केले चुकीचे उपचार, अखेर मुलीच्या फुफ्फुसाचा भाग काढला

Mumbai : पोलिसांची गाडी रोखणाऱ्या 'त्या' तरुणीची सायबर सेलमध्ये धाव; ऑनलाइन छळ, अश्लील ट्रोलिंगविरोधात तक्रार