राष्ट्रीय

कुत्र्याला ड्रायव्हिंग सीटवर घेऊन चालवत होता कार! पोलिसांनी जप्त केलं ड्रायव्हिंग लायसन्स, जाणून घ्या नियम

केरळमधील एका चर्च फादरचा हा व्हिडिओ असून केरळ मोटार वाहन विभागाने कारवाई करत त्यांचं ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित केलं आहे.

Suraj Sakunde

तुम्ही आजपर्यंत अनेक प्राणी प्रेमी पाहिले असतील. हे लोक त्यांच्या पाळीव प्राण्यांवर मुलासारखं प्रेम करतात. त्यांना सर्वत्र आपल्यासोबत घेऊन जातात. विशेषत: कुत्र्यांच्या बाबतीत ते खूपच संवेदनशील असतात. आपल्या पाळीव कुत्र्यांना सहलीलाही ते नेतात. परंतु यादरम्यान त्यांचे श्वान कारच्या मागील सीटवर बसलेले दिसतात.

मात्र, सध्या सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल होत आहे, ज्यामध्ये एक व्यक्ती कुत्र्याला आपल्या मांडीवर घेऊन कार चालवत आहे. रिपोर्टनुसार, हा व्हिडिओ केरळमधील एका चर्च फादरचा आहे. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर केरळ मोटार वाहन विभागाने संबंधित व्यक्तीवर कारवाई करत त्याचं ड्रायव्हिंग लायसन्स निलंबित केलं आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण:

अलप्पुझा आरटीओ अधिकाऱ्याच्या म्हणण्यानुसार, 5 जून रोजी मारुती एर्टिगामध्ये (KL02AS3460) संबंधित व्यक्ती आपल्या श्वानाला मांडीवर बसवून गाडी चालवत होता. त्याने स्वत: हा व्हिडिओ सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर पोस्ट केला आहे. या व्हिडिओमध्ये कुत्रा अनेकदा खिडकीतून डोके बाहेर काढताना दिसतो. रस्ता सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हे धोकादायक आहे, त्यामुळे संबंधित कारवाई करण्यात आली आहे.

कारच्या ड्रायव्हिंग सीटवर कुत्र्याला बसवण्याबाबत ड्रायव्हर बिजू व्हिन्सेंट यांनी सांगितले की, कुत्रा आजारी होता, म्हणून त्याने त्याला आपल्याजवळ बसवले होते. मात्र, अशा पद्धतीने कार चालवणे बेकायदेशीर आहे. असं केल्यानं चालकाचे लक्ष विचलित होऊ शकते. त्यामुळे अपघात होऊ शकतात. जर तुम्ही पाळीव प्राण्यासोबत प्रवास करत असाल तर त्यांना मागील सीटवर ठेवावं. याशिवाय कारमध्ये जाताना तुम्ही तुमच्या पाळीव कुत्र्याला बेल्टने बांधू शकता.

Maharashtra Assembly Elections Results 2024 LIVE: महाराष्ट्राचा महानिकाल! एकाच क्लिकवर बघा कल आणि निकाल

अपक्ष, बंडखोरांसाठी रस्सीखेच; महायुती, महाआघाडीत खलबते

राहुल गांधी, खर्गे यांनी माफी मागावी, अन्यथा कारवाईला सामोरे जावे; विनोद तावडे यांची नोटीस

...तोपर्यंत मतमोजणी केंद्र सोडू नका; शरद पवारांचा उमेदवारांना आदेश

झारखंडमध्ये आज मतमोजणी