राष्ट्रीय

"आय लव्ह इंडिया, लव्ह मोदी..."; डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतासाठी संदेश दिल्याचा लॉरा लूमर यांचा दावा

काही काळापूर्वी लॉरा लूमर यांनी अमेरिका फर्स्ट धोरणाचा प्रचार करत असताना भारतीय नागरिकांना हिणवले होते. मात्र आता त्या दिल्लीत आल्या असून त्यांचे सूर बदलले आहेत. लॉरा लूमर यांनी सांगितले की, 'मी आताच तासाभरापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर बोलले. तेव्हा ट्रम्प यांनी मला सांगितले की माझा भारतासाठी संदेश आहे. ट्रम्प म्हणालेत की, 'आय लव्ह इंडिया, लव्ह मोदी...

Swapnil S

नवी दिल्ली : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या कट्टर समर्थक आणि अतिउजव्या विचारसरणीच्या राजकीय कार्यकर्त्या लॉरा लूमर या त्यांच्या धाडसी आणि बेधडक विधानांसाठी ओळखल्या जातात. काही काळापूर्वी त्यांनी अमेरिका फर्स्ट धोरणाचा प्रचार करत असताना भारतीय नागरिकांना हिणवले होते. मात्र आता त्या दिल्लीत आल्या असून त्यांचे सूर बदलले आहेत. लॉरा लूमर यांनी सांगितले की, 'मी आताच तासाभरापूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याशी फोनवर बोलले. तेव्हा ट्रम्प यांनी मला सांगितले की माझा भारतासाठी संदेश आहे. ट्रम्प म्हणालेत की, 'आय लव्ह इंडिया, लव्ह मोदी. मला भारतीय लोक आवडतात. पंतप्रधान मोदी एक उत्तम नेते आणि माझे चांगले मित्र आहेत. कृपया भारतातील लोकांना सांगा की मी लवकरच पुन्हा एकदा भारतात येईन', असा ट्रम्प यांनी म्हटलं असल्याचं लॉरा लूमर यांनी सांगितलं आहे.

ट्रम्प यांच्या धोरणाविरोधात थेट पाकला सुनावले

भारताच्या बाजूने बोलत असताना त्यांनी ट्रम्प यांच्या धोरणाविरोधात जाऊन थेट पाकिस्तानला सुनावले आहे. येथील एका परिषदेत बोलत असताना लॉरा लूमर यांनी पाकिस्तान हा जगाला इस्लामिक दहशतवाद निर्यात करणारा मोठा देश आहे, असे म्हटल आहे. तसेच अमेरिकेने पाकिस्तानच्या शाहबाज शरीफ सरकारशी मैत्री करू नये, असेही त्या म्हणाल्या.

अनेक दहशतवादी हल्ल्यामागे पाकचा हात...

मुस्लीमविरोधी विधानांसाठी प्रसिद्ध असलेल्या लूमर यांनी पाकिस्तानवर उघडपणे जिहादी विचारांचा प्रचार केल्याचा आरोप करत टीका केली. पाकिस्तान उघडपणे जिहादी आणि सरिया समर्थक देश म्हणून काम करतो. जगभरात जेव्हा इस्लामी दहशतवादी हल्ले घडतात, तेव्हा त्याचा काही ना काही संबंध पाकिस्तानशी असल्याचे दिसून येते, असेही लूमर पुढे म्हणाल्या. इस्लामिक दहशतवादावर भाष्य करत असताना लूमर म्हणाल्या की, जगभरातील अनेक दहशतवादी हल्ल्यामागे पाकिस्तान असल्याचे समोर आलेले आहे. डोनाल्ड ट्रम्प यांच्या प्रचारासाठी मैदानात शड्डू ठोकून असलेल्या लूमर यांनी भारत आणि यूकेमध्ये नुकत्याच झालेल्या दहशतवादी हल्ल्यांमागे पाकिस्तानमधील संघटनांचा हात असल्याचा आरोप केला.

अक्षय्य तृतीयेपूर्वी सोन्याचे दर वाढण्याची शक्यता; ग्राहकांच्या खरेदी धोरणावर परिणाम होणार

राज्यात दोन दिवस वादळी पाऊस, गारपिटीचा इशारा; विदर्भ-मराठवाड्यावर अवकाळीचे सावट, हवामान विभागाने वर्तविला अंदाज

...आणि आता तेलही! युद्धामुळे भारतातील कच्च्या तेलाच्या पुरवठ्यावर परिणाम

मुंबईची तुंबई होणार; मिठी नदीच्या सफाईसाठी कंत्राटदारच नाही, स्थायी समितीत सदस्य आक्रमक

LPG ची टंचाई कायमच; केंद्र सरकारची कबुली, PNG स्वीकारण्याचाही सल्ला