राष्ट्रीय

नितीश कुमारांसाठी दरवाजा नेहमीच खुला आहे -लालूप्रसाद

Swapnil S

पाटणा : बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांच्यासाठी पक्षाचे दार नेहमीच खुले आहे, असे राष्ट्रीय जनता दलाचे (आरजेडी) अध्यक्ष लालूप्रसाद यादव यांनी शुक्रवारी सांगितले.

राजदशी असमारी अल्पकालीन युती जदयूने संपुष्टात आणली आणि नितीश कुमार भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएमध्ये परतले. याबद्दल प्रसाद यांनी मौन बाळगले होते. मात्र नितीश कुमार आणि लालूप्रसाद यांनी गुरुवारी विधानसभेच हस्तांदोलन केले. या पार्श्वभूमीवर पत्रकारांनी लालूप्रसाद यादव यांना विचारले असता ते म्हणाले की, त्यांना परत येऊ द्या, मग बघू.

१९७० च्या दशकात विद्यार्थी नेते म्हणून नितीश कुमार यांना त्यांच्या त्या दिवसांपासून ओळखणारे लालूप्रसाद, या माजी सहयोगीसाठी दरवाजे अजूनही खुले आहेत की नाही यावर ते नेहमीच खुले असतात, असे सांगितले.

तथापि, भाजपचे प्रदेशाध्यक्ष व उपमुख्यमंत्री सम्राट चौधरी यांनी लालूप्रसाद यांच्या या वक्तव्यावर सांगितले की, लालूजींच्या बोलण्याने काय फरक पडणार आहे? नितीश कुमार यांनी ते ठरवायचे आहे की, त्यांना भाजपसोबत राहावयाचे आहे की, राजदसोबत जायचे आहे.

'इराणसोबत व्यापारी करार केल्यास...', चाबहार बंदर करारानंतर अमेरिकेचा भारताला इशारा

PM Modi: उमेदवारी दाखल करण्यापूर्वी पंतप्रधान मोदी का गेले कालभैरव मंदिरात?

भीमा-कोरेगाव प्रकरण: गौतम नवलखा यांना मोठा दिलासा; SC ने दिला जामीन; उच्च न्यायालयाने घातलेली स्थगिती वाढवण्यास नकार

"सीमा हैदर अनेकदा पाकिस्तानी आर्मी कँम्पमध्ये जायची; ती कम्प्युटर वापरण्यातही पटाईत"; खळबळजनक दावा

'भिडू' बोलून 'जग्गूदादा'ची नक्कल महागात पडणार! जॅकी श्रॉफची हायकोर्टात धाव; खटला केला दाखल