राष्ट्रीय

DRDO चा कृत्रिम पाय दिव्यांगांना आधार; १२५ किलो भार उचलू शकणार; २० हजारांपेक्षा कमी किमतीत

भारताची संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) आणि ‘एम्स-बिबीनगर’ यांनी एकत्रितपणे स्वदेशी पद्धतीने कार्बन फायबरने कृत्रिम पाय बनवला आहे. हा कृत्रिम पाय वजनाने हलका पण मजबूत आहे. विशेष म्हणजे २० हजार रुपये किंमतीत तो उपलब्ध होणार आहे.

Swapnil S

हैद्राबाद : भारताची संरक्षण संशोधन व विकास संघटना (डीआरडीओ) आणि ‘एम्स-बिबीनगर’ यांनी एकत्रितपणे स्वदेशी पद्धतीने कार्बन फायबरने कृत्रिम पाय बनवला आहे. हा कृत्रिम पाय वजनाने हलका पण मजबूत आहे. विशेष म्हणजे २० हजार रुपये किंमतीत तो उपलब्ध होणार आहे.

‘डीआरडीएल’चे संचालक जी. ए. श्रीनिवास मूर्ती व ‘एम्स बीबीनगर’चे कार्यकारी संचालक डॉ. ए. संता सिंह यांनी या कृत्रिम पायाचे अनावरण केले.

हा कृत्रिम पाय आधुनिक कार्बन फायबर सामुग्रीने बनवला आहे. तो हलका, टिकाऊ व लवचिक आहे. ज्यांचा पाय कापला गेला आहे आणि दैनंदिन जीवनात चालण्या-फिरण्यात अडचणी येत आहेत. त्यांच्यासाठी तो उपयुक्त आहे.

१२५ किलो वजन भार पेलण्यास हा कृत्रिम पाय सक्षम आहे. तो बायोमॅकेनिकल पद्धतीने तपासला आहे. तो पूर्णपणे सुरक्षित आहे.

कोणी बनवला पाय?

‘डीआरडीओ’ची प्रयोगशाळा डीआयडीएल व एम्स बीबीनगर, तेलंगणा यांनी हा कृत्रिम पाय बनवला. सध्या परदेशी कृत्रिम पायाची किंमत २ लाख असते. पण या पायाची किंमत २० हजारांपेक्षा कमी ठेवण्यात येणार असल्याची शक्यता आहे. याचा फायदा गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांना होऊ शकेल.

कृत्रिम पायाची वैशिष्ट्ये

  • १२५ किलो भार पेलण्याची क्षमता

  • वेगवेगळ्या वजनाच्या लोकांसाठी खास पाय

  • संपूर्ण स्वदेशी बनावटीचे तंत्रज्ञान

  • कमी खर्च; उच्च गुणवत्ता

  • ज्येष्ठ नागरिक, आरामदायी उपयोगासाठी

  • भारतीय जीवनशैलीनुसार डिझाईन

महादेवी हत्तीणीच्या स्थलांतराचे उच्च न्यायालयाचे आदेश; "क्रूर आणि निर्दय वागणूक" असल्याचे निरीक्षण

त्याने बोलावल्यावर हॉटेलमध्ये का जायचीस? रेपचा आरोप करणाऱ्या महिलेला सुप्रीम कोर्टाने फटकारले

जुनाट शस्त्रांनी आजची युद्धे कशी जिंकणार? आयात तंत्रज्ञानावर अवलंबून राहणे धोक्याचे: CDS अनिल चौहान यांचे परखड मत

बुमराहने चौथी कसोटी खेळावी! संघाला गरज असताना विश्रांती घेणे चुकीचे; माजी क्रिकेटपटूंचे स्पष्ट मत

मंदिरात चोरी करायला गेला...पण, झोपेने घात केला! पुढे जे झालं ते...VIDEO व्हायरल