दुधवा बफर झोनमध्ये २५ गिधाडांचा मृत्यू : विषबाधेचा संशय 
राष्ट्रीय

दुधवा बफर झोनमध्ये २५ गिधाडांचा मृत्यू; विषबाधेचा संशय

दुधवा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील भिरा रेंजमध्ये २५ गिधाडांचे मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे.

Swapnil S

लखीमपूर खेरी : दुधवा व्याघ्र प्रकल्पाच्या बफर झोनमधील भिरा रेंजमध्ये २५ गिधाडांचे मृतदेह आढळल्याने खळबळ माजली आहे. या दुर्दैवी घटनेमागील नेमके कारण शोधण्यासाठी वनविभागाचे अधिकारी आता बरेली येथील 'भारतीय पशुवैद्यकीय संशोधन संस्थेच्या' (आयव्हीआरआय) अहवालाची प्रतीक्षा करत आहेत.

मंगळवारी दुधवा बफर झोनमधील सेमराई गावातील एका शेतात २५ गिधाडे मृतावस्थेत आढळली. ही गिधाडे प्रामुख्याने 'हिमालयन ग्रिफिन' प्रजातीची असल्याचे समजते. वन्यजीव संरक्षण कायद्यांतर्गत गिधाडे ही संरक्षित प्रजाती असून ती अतिसंकटग्रस्त पक्ष्यांच्या श्रेणीत येतात.

विषबाधेचा प्राथमिक अंदाज

तपास अधिकाऱ्यांच्या मते, या गिधाडांचा मृत्यू शेतात पडलेले कुत्र्यांचे मृतदेह खाल्ल्यामुळे झाला असावा. डॉ. दया शंकर यांच्या नेतृत्वाखालील पशुवैद्यकीय डॉक्टरांच्या पथकाने २३ गिधाडांचे शवविच्छेदन केले. मात्र, शवविच्छेदन अहवालात विषबाधा झाल्याचे स्पष्ट झाले असले तरी, विषाचे नेमके स्वरूप अद्याप समजू शकलेले नाही. प्राथमिक तपासणीत कुत्र्यांच्या मृतदेहामध्ये काही विषारी पदार्थ असल्याचे दिसून आले आहे. हेच मृतदेह खाल्ल्याने गिधाडांचा मृत्यू झाला असावा, असे डॉ. दया शंकर यांनी सांगितले.

५ गिधाडे बेशुद्धावस्थेत

दुधवा बफर झोनच्या उपसंचालिका कीर्ती चौधरी यांनी दिलेल्या माहितीनुसार, शेतात २५ गिधाडे मृतावस्थेत पडलेली होती. त्याच ठिकाणी ५ गिधाडे बेशुद्धावस्थेत सापडली, ज्यांच्यावर तातडीने उपचार करून त्यांना पुन्हा निसर्गात सोडण्यात आले. घटनेच्या काही अंतरावरच काही कुत्र्यांचे मृतदेहही आढळून आले आहेत.

पुढील तपास सुरू

दुधवा व्याघ्र प्रकल्पाचे क्षेत्र संचालक आणि मुख्य वनसंरक्षक डॉ. एच. राजमोहन यांच्या सूचनेनुसार, दोन गिधाडांचे पूर्ण मृतदेह आणि इतर २३ गिधाडांचे विसेरा (अंतेंद्रिये) अधिक सखोल तपासणीसाठी आयव्हीआरआय, बरेली येथे पाठवण्यात आले आहेत. या अहवालानंतरच मृत्यूचे नेमके कारण आणि विषाचा प्रकार स्पष्ट होईल.

आपत्ती व्यवस्थापनात तुकाराम मुंढेंना ‘नो एंट्री’; पुन्हा विनिता वैद सिंघल यांची वर्णी

Mumbai: मध्य रेल्वेकडून १५ डब्यांच्या लोकलची तयारी; टिटवाळा ते वासिंददरम्यान आज रात्री विशेष ब्लॉक

FYJC Admission 2026 : अकरावी प्रवेश प्रक्रियेचे वेळापत्रक जाहीर; आजपासून भरता येणार अर्जाचा भाग एक

उत्तर सिक्कीममध्ये भूस्खलन; लष्कराकडून १३५ पर्यटकांची सुखरूप सुटका, बचावकार्य सुरू

युद्धविराम धोक्यात! इस्रायलचा लेबनॉनवर भीषण हल्ला; होर्मुझ सामुद्रधुनीतील तणाव कायम, बैरुतमध्ये २०३ जणांचा मृत्यू