राष्ट्रीय

दुर्गापूजा मंडळांना आता १ लाख १० हजार अनुदान; वीजबिलातही ८० टक्क्यांची सवलत, पश्चिम बंगाल सरकारचा निर्णय

पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील ४०,००० दुर्गापूजा मंडळांना दिले जाणारे अनुदान ८५ हजारांवरून १.१० लाख केले आहे. याशिवाय, पूजा मंडपांसाठी वीजबिलात ८० टक्क्यांची सवलत दिली आहे.

Swapnil S

कोलकाता : पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी राज्यातील ४०,००० दुर्गापूजा मंडळांना दिले जाणारे अनुदान ८५ हजारांवरून १.१० लाख केले आहे. याशिवाय, पूजा मंडपांसाठी वीजबिलात ८० टक्क्यांची सवलत दिली आहे. अग्निशमन परवान्यासह सर्व राज्य सरकारी शुल्कातून सूट देतानाच, कोलकाता महानगरपालिका, पंचायत व नगरपालिका यांच्याकडून करमाफीही जाहीर केली आहे.

यंदाचा दुर्गापूजा कार्निव्हल ५ ऑक्टोबरला होणार असून विसर्जन २ ते ४ ऑक्टोबरदरम्यान होईल. दुर्गा पूजेदरम्यान सुरक्षेचे उपाय म्हणून सीसीटीव्ही, ड्रोन मॉनिटरिंग, वॉच टॉवर्स, महिलांसाठी सुलभ व्यवस्था, आणि स्वतंत्र प्रवेश-निर्गम मार्ग असावेत, असे आदेशही त्यांनी दिले. तसेच अॅम्ब्युलन्स तयार ठेवणे, योग्य प्रकाशव्यवस्था आणि गर्दी नियंत्रणाचे निर्देशही दिले. दरम्यान, २०२६च्या विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या निर्णयाचे मंडळांकडून स्वागत, तर विरोधकांकडून टीका करण्यात आली आहे.

गणेशोत्सव मंडळांनाही अनुदानाची अपेक्षा

पश्चिम बंगाल सरकारने तेथील दुर्गापूजा मंडळांना १.१० लाख रुपये अनुदान जाहीर केल्याच्या पार्श्वभूमीवर मुंबईसह महाराष्ट्रातील गणेशोत्सव मंडळांनाही अशा प्रकारे अनुदान मिळणार का, अशी चर्चा आता गणेशभक्तांमध्ये सुरू झाली आहे.

"आज परत कोणीतरी गावी जाणार..."; आदित्य ठाकरेंची एकनाथ शिंदेंवर बोचरी टीका

छत्तीसगड : सुरक्षा दलांवर मोठे हल्ले घडवणारा कुख्यात नक्षलवादी माडवी हिडमा ठार; सरकारने ५ कोटींचे ठेवले होते बक्षीस

बॉलिवूडच्या प्रसिद्ध दिग्दर्शकावर गुन्हा दाखल; चित्रपट करण्याच्या बहाण्याने डॉक्टरांचे ३० कोटी हडपल्याचा आरोप

आधार कार्ड नागरिकत्वाचा नव्हे फक्त ओळखीचा पुरावा; ECI चा सुप्रीम कोर्टात पुनरुच्चार

Mumbai : आज दुपारपर्यंत CNG पुरवठा होणार सुरळीत; MGL ने केले जाहीर