नवी दिल्ली : प्रयागराज येथे झालेल्या महाकुंभ मेळ्यात नाविक पिंटू महारा याने ४५ दिवसात ३० कोटी रुपये कमावले. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी त्याचे कौतुक केले. आता या खलाशाला आयकर विभागाकडून कर नोटीस मिळाली आहे, असे वृत्त समोर आले आहे. आयकर विभागाने या खलाशाला १२.८ कोटी रुपयांची कराची नोटीस पाठवली आहे.
प्रयागराजमध्ये रोज ५०० रुपये कमवणाऱ्या पिंटूने ४५ दिवसांत ३० कोटी रुपये कमवले. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी विधानसभेत या खलाशाच्या कामगिरीचा उल्लेख केला. राज्याचे मुख्यमंत्री म्हणाले की, १३० बोटी असलेल्या कुटुंबाने एकूण ३० कोटी रुपये कमावले. म्हणजे प्रत्येक बोटीला रोज ५० ते ५२ हजार रुपये मिळत होते. याआधी एका बोटीतून दररोज एक ते दोन हजार मिळायचे पण, महाकुंभाच्या काळात ही कमाई अनेक पटींनी वाढली. पण, प्राप्तिकर विभागाने पिंटूकडे १२.८ कोटी रुपयांचा कर मागितला आहे. आयकर कायदा, १९६१ च्या कलम ४ आणि ६८ अंतर्गत नोटीस पाठवली गेली आहे.