राष्ट्रीय

पंजाबचे मुख्यमंत्री मान यांच्या घरावर निवडणूक आयोगाचा छापा

दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या पथकाने गुरुवारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या दिल्लीतील निवासस्थानी छापा टाकला असून, कपूरथला हाऊसबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : दिल्ली विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाच्या पथकाने गुरुवारी पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या दिल्लीतील निवासस्थानी छापा टाकला असून, कपूरथला हाऊसबाहेर मोठ्या प्रमाणात सुरक्षा दल तैनात करण्यात आले आहे.

मान यांच्या घरी पोहोचलेले निवडणूक अधिकारी ओ. पी. पांडे यांनी सांगितले की, पैसे वाटल्याची तक्रार आम्हाला मिळाली आहे. आमचा एफएसटी इथे आला असता त्याला आत प्रवेश दिला गेला नाही. पैसे वाटपाची तक्रार निवडणूक आयोगाला ‘सीव्हीजिल’ ॲपवर प्राप्त झाली होती. त्यानुसार हा छापा टाकण्यात आला.

याबाबत ‘आप’ने आपल्या सोशल मीडिया पोस्टमध्ये लिहिले की, पराभव पाहून भाजप हादरला असून, भाजपचे दिल्ली पोलीस पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान यांच्या दिल्लीतील घरावर छापा टाकण्यासाठी पोहोचले. भाजपवाले दिवसाढवळ्या पैसे, चपला, बेडशीटचे वाटप करत आहेत, पण पोलीस आणि निवडणूक आयोगाच्या डोळ्यांवर पट्टी बांधलेली आहे.

मते विकत घेण्यासाठी भाजप उमेदवाराच्या कार्यालयात लाखो रुपये खुलेआम मोजले जात आहेत. पोलीस आणि निवडणूक आयोगात हिंमत असेल तर त्यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या घरावर छापा टाकावा, असे आव्हान ‘आप’ने पोलिसांना दिले आहे.

यमुना नदीत विष टाकल्याचे पुरावे द्या! निवडणूक आयोगाचे केजरीवाल यांना आदेश

यमुना नदीतील अमोनियाचे वाढते प्रमाण आणि नदीत विष टाकण्यात आल्याच्या प्रश्नांची सरमिसळ करू नका, असे निवडणूक आयोगाने गुरुवारी ‘आप’चे निमंत्रक अरविंद केजरीवाल यांना बजावले आणि हरयाणा सरकारवर केलेल्या आरोपाबाबत स्पष्टीकरण करण्याची आणखी एक संधी दिली आहे. केजरीवाल यांनी दिलेल्या उत्तराने आयोगाचे समाधान झाले नाही. त्यामुळे आयोगाने त्यांना वस्तुस्थितीजन्य पुरावे सादर करण्यास सांगितले आहे. किती प्रमाणात विष टाकण्यात येते, निश्चित कोणत्या ठिकाणी विष मिसळण्यात येते, कोणत्या स्वरूपाचे विष, याबाबतही स्पष्टीकरण देण्यास त्यांना सांगण्यात आले आहे.

दिल्ली जल मंडळाची विष शोधण्याची पद्धत, विष नक्की कोणत्या ठिकाणी आढळले आणि अभियंते यांच्याबाबतचा सविस्तर तपशील शुक्रवारपर्यंत सादर करण्यास सांगण्यात आले आहे. नियोजित वेळेत सविस्तर माहिती उपलब्ध करून दिली नाही तर आयोग योग्य तो निर्णय घेईल, असेही स्पष्ट करण्यात आले आहे.

निवडणूक सभेला संबोधित करताना केजरीवाल यांनी, भाजप आपल्या गलिच्छ राजकारणाने दिल्लीतील जनतेला त्रास देत आहे. हरयाणातून येणाऱ्या यमुनेच्या पाण्यात ते विष मिसळत आहेत. हे प्रदूषित पाणी इतके विषारी आहे की दिल्लीत असलेल्या जलशुद्धीकरण केंद्रांच्या मदतीने त्यावर प्रक्रियाही करता येत नाही. भाजपला दिल्लीकरांची सामूहिक हत्या करायची आहे, मात्र आम्ही हे होऊ देणार नाही,' असा आरोप केजरीवालांनी केला होता.

Maratha Reservation : ''मराठा-कुणबी एकच, जीआरशिवाय उपोषण थांबणार नाही''; शिंदे समितीशी चर्चा : मनोज जरांगे ठाम

Maratha Reservation : शिंदे समितीची मनोज जरांगे यांच्याशी चर्चा; मराठा आरक्षणावर निर्णायक टप्पा?

Maratha Reservation : मराठा वादळाने मुंबईला हादरा; आता माघार नाही – मनोज जरांगेंचा निर्धार; पावसामुळे आंदोलकांचे प्रचंड हाल

मुंबईला पावसाने झोडपले; पुढील तीन दिवस मध्यम पावसाची शक्यता

महायुतीच्या घोडचुकीमुळे मुंबईकर वेठीस; मराठा आंदोलनामुळे मुंबईत गोंधळाची स्थिती