मतदार यादीत नाव नसल्यास पुन्हा अर्ज करा; नोंदणी केली असली तरी कारवाई नाही- निवडणूक आयोग 'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
राष्ट्रीय

मतदार यादीत नाव नसल्यास पुन्हा अर्ज करा; नोंदणी केली असली तरी कारवाई नाही- निवडणूक आयोग

विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेदरम्यान पूर्वी मतदार म्हणून नोंदणी झालेली असूनही ज्यांची नावे प्रारूप मतदार यादीत आलेली नाहीत, अशांना व्याने फॉर्म ६ भरून अर्ज करता येईल. असा अर्ज केल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही फौजदारी कारवाई केली जाणार नाही, असे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केले आहे.

Swapnil S

नवी दिल्ली : विशेष सखोल मतदार यादी पुनरीक्षण (एसआयआर) प्रक्रियेदरम्यान पूर्वी मतदार म्हणून नोंदणी झालेली असूनही ज्यांची नावे प्रारूप मतदार यादीत आलेली नाहीत, अशांना व्याने फॉर्म ६ भरून अर्ज करता येईल. असा अर्ज केल्यामुळे त्यांच्यावर कोणतीही फौजदारी कारवाई केली जाणार नाही, असे प्रतिज्ञापत्र निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयात दाखल केले आहे.

पूर्वीच्या मतदार यादीत नाव असलेल्या; मात्र एसआयआर प्रक्रियेदरम्यान प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या व्यक्तींनी फॉर्म ६ भरल्यास लोकप्रतिनिधित्व कायदा, १९५० मधील कलम ३१ अंतर्गत त्यांच्यावर खटला दाखल होऊ शकतो, अशी भीती काही मतदारांमध्ये निर्माण झाली होती. ती दूर करण्यासाठी आयोगाने सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्र दाखल केले.

एसआयआरपूर्वी मतदार यादीत नाव होते आणि एसआयआरदरम्यान प्रारूप मतदार यादीत नाव आले नाही या कारणावरून फॉर्म-६ दाखल करणाऱ्या कोणत्याही अर्जदारावर खटला दाखल केला जाणार नाही. मात्र, संबंधित अर्जदाराचे नाव अन्य कोणत्याही लोकसभा किंवा विधानसभा मतदारसंघाच्या मतदार यादीत नसावे, असे आयोगाने स्पष्ट केले आहे.

मतदार यादीतून वगळलेल्या अनुपस्थित, स्थलांतरित, मृत आणि दुबार नोंदणी असलेल्या मतदारांशी संपर्क साधून त्यांची नावे मतदार यादीत समाविष्ट करण्याबाबत सर्वोच्च न्यायालयाने केलेल्या सूचनेचीही आयोगाने दखल घेतली आहे.

संधी नाकारली जाणार नाही

पात्रता निकषांची पूर्तता करणाऱ्या कोणत्याही मतदाराला अंतिम मतदार यादीत नाव समाविष्ट करण्याची संधी नाकारली जाणार नाही, यासाठी यंत्रणा उभारण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्याचवेळी मतदारांच्या दुबार नोंदणीला प्रतिबंध करण्यासाठी आवश्यक खबरदारी घेतली जाणार असल्याचे आयोगाने म्हटले आहे.

आव्हानात्मक काम...

निवडणूक प्रक्रियेची शुद्धता राखणे ही आपली घटनात्मक जबाबदारी असून आयोग त्यासाठी कटिबद्ध आहे, असे प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आले आहे. मोठ्या प्रमाणातील आकडेवारी आणि संपूर्ण माहितीचे डिजिटल स्वरूप यामुळे काही आव्हाने निर्माण होत असल्याचेही आयोगाने मान्य केले.

अर्ज कुणाकडे करावा...

गणना अर्ज (ॲनेक्स्चर ए) मतदारांनी आपल्या क्षेत्रातील मतदार नोंदणी अधिकारी, सहाय्यक मतदार नोंदणी अधिकारी किंवा बूथस्तरीय अधिकारी यांच्याकडे सादर करावा.

ज्या मतदारांनी स्थलांतर केलेले नाही, ते गणना अर्ज (ॲनेक्स्चर ए) आणि यापूर्वी गणना अर्ज सादर न करण्याचे कारण स्पष्ट करणारे अ‍ॅनेक्स्चर बीमधील निवेदन सादर करू शकतात.

अर्ज संबंधित ईआरओ, एईआरओ किंवा बीएलओंना देता येईल. ईसीआयनेटवर अर्ज सादर करू शकता.

(संबधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

आरोग्य क्षेत्र आयसीयूत; केंद्राच्या अहवालातून महाराष्ट्राचे जळजळीत वास्तव उघड

आदिवासींचा मताधिकारही नाकारला; पंतप्रधान मोदी यांचा काँग्रेसवर आरोप

देशाची बदनामी केलीत तर ३० वर्षे सत्ता मिळणार नाही; अमित शहा यांचे राहुल गांधींवर टीकास्त्र

Mumbai : कंपन्यांनी थकवला २३३ कोटी मालमत्ता कर; दहा ते १५ वर्षांपासून BMC ला वसुलीत अपयश

महाबळेश्वरमधील तीन हॉटेल्सचे परवाने निलंबित; अन्न व औषध प्रशासनाची कारवाई