राष्ट्रीय

जागतिक आरोग्य आणीबाणी संपुष्टात कोविडवर नियंत्रण : जागतिक आरोग्य संघटनेचा निर्णय

कोरोना व्हायरसचा पहिला संसर्ग चीनच्या वुहान शहरात २०१९ च्या उत्तरार्धात नोंदवला गेला होता

नवशक्ती Web Desk

'कोविड-१९'ची साथ संपुष्टात आल्याची घोषणा करत जागतिक आरोग्य संघटनेने जगभरात मागील तीन वर्षांपासून लागू केलेली आरोग्य आणीबाणी मागे शुक्रवारी मागे घेतली. जागतिक अर्थ व्यवस्था उद्ध्वस्त करणाऱ्या या महासाथीने सुमारे ६८ कोटी लोकांना आपल्या विळख्यात घेतले. त्यातील ७० लाखांहून अधिक लोकांचा जीव घेतला. आरोग्य आणीबाणी उठवण्याच्या निर्णयामुळे लागू करण्यात आलेले सर्व निर्बंध मागे घेतले जाणार आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या आपत्कालीन समितीची गुरुवारी बैठक झाली. यात जगभरातील कोविडसंदर्भात आढावा घेण्यात आला. सर्वच देशांनी या महासाथीवर नियंत्रण मिळवल्याचे तसेच रुग्णांमध्ये कमालीची घट झाल्याचे लक्षात आले. त्यामुळे सार्वजनिक आरोग्य आणीबाणी संपुष्टात आणण्याची या बैठकीत शिफारस करण्यात आली. जागतिक आरोग्य संघटनेच्या आकडेवारीनुसार जानेवारी २०२१ मध्ये दर आठवड्याला एक लाखाहून अधिक असलेला जागतिक मृत्युदर २४ एप्रिल २०२३ रोजी आठवड्यात फक्त ३,५०० पेक्षा खाली आला. त्यामुळे आता या साथीची तितकीशी भीती राहिलेली नाही.

कोविड-१९ या महासाथीचा अंत होत असला तरी त्याची सुरुवात कशी झाली हा प्रश्न अनुत्तरित आहे. कोरोना व्हायरसचा पहिला संसर्ग चीनच्या वुहान शहरात २०१९ च्या उत्तरार्धात नोंदवला गेला होता. हळूहळू हा संसर्गजन्य आजार जगभर पसरला. कोरोना विषाणूची उत्पत्ती संसर्ग पसरवणाऱ्या चीनमधून रॅकून कुत्र्यांपासून झाली असावी, असाही अंदाज बांधला जात आहे.

देशात मतदार यादीची झाडाझडती; केंद्रीय निवडणूक आयोगाची तयारी

मद्य परवान्यावरून सरकारचा सावध पवित्रा; विधिमंडळाला विश्वासात घेतल्याशिवाय परवाने वाटप नाहीच -अजित पवार

अंतराळवीर शुभांशू शुक्ला आज पृथ्वीकडे परतणार

जनसुरक्षा कायदा ‘अर्बन नक्सल’विरोधात उपयुक्त ठरेल; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे प्रतिपादन

विरोधी पक्षनेतेपदासाठी ‘फिल्डिंग’; काँग्रेस आणि शिवसेना ठाकरे गटामध्ये जोरदार रस्सीखेच, 'ही' नावे चर्चेत