@ANI
राष्ट्रीय

महिला कुस्तीपटू लैंगिक शोषण प्रकरण : पुढील सुनावणी होईपर्यंत ब्रिजभूषण सिंह यांना अंतरिम जामीन मंजूर

आता २० जुलै रोजी त्यांच्या नियमीत जामीनावर कोर्टात सुनावणी होणार आहे

नवशक्ती Web Desk

भारतीय कुस्ती महासंघाचे माजी अध्यक्ष आणि भाजप खासदार ब्रिजभूषण शरण सिंह आणि विनोद तोमर यांच्या नियमीत जामिनावर २० जुलै रोजी सुनावणी होणार आहे. ब्रिजभुषण यांनी पुढील सुनावणीच्या तारखेपर्यंत अंतरिम जामीन मंजूर करण्यात आला आहे. ब्रिजभूषण यांच्या वकिलाने त्यांची बाजू मांडताना सांगितलं की, आरोपपक्ष दाखल होईपर्यंत ब्रिजभूषण शरण सिंह यांना अटक करण्यात आली नाही, याचा अर्थ असा आहे की त्यांच्याविरुद्ध असे कोणतेही पुरावे किंवा दावे आढळून आले नाहीत.

दिल्लीच्या राऊस अव्हेन्यू न्यायालयाने कुस्तीपटूंच्या लैंगिक छळाच्या आरोपात ब्रिजभूषण यांना अंतरिम जामीन मंजूर केली आहे. ते स्वत: न्यायालयात हजर झाले त्यावेळी त्यांच्या घराबाहेर तसंच न्यायालयाबाहेर कडक बंदोबस्त ठेवण्यात आला होता. आता २० जुलै रोजी त्यांच्या नियमीत जामीनावर कोर्टात सुनावणी होणार आहे. त्याचा निर्णय येईपर्यंत ते अंतरिम जामीनावर राहणार आहेत.

नव्या भारताचे शिल्पकार

पंतप्रधान नरेंद्र मोदी : कणखर राष्ट्रनेता!

आजचे राशिभविष्य, १७ सप्टेंबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणूका पुन्हा लांबणीवर; सर्वोच्च न्यायालयाने दिली नवी 'डेडलाईन', आयोगालाही फटकारले

खाडाखोड असेल तर मराठ्यांना प्रमाणपत्र देऊ नये; ओबीसी उपसमितीच्या बैठकीत महत्त्वाचा निर्णय