राष्ट्रीय

स्पाईसजेटच्या व्यवस्थापकीय संचालकांवर फसवणुकीचा गुन्हा दाखल

वृत्तसंस्था

स्पाईसजेट या विमान कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालकांवर लाखोंच्या फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर एअरलाइन कंपनीच्या वतीने, हे प्रकरण मूर्खपणाचे वर्णन केले आहे.

गुरुग्राम पोलिसांनी स्थानिक रहिवाशाच्या तक्रारीवरून स्पाइसजेट कंपनीचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंह यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल केला आहे. कंपनीचे शेअर्स वाटप करून देण्याच्या नावाखाली फसवणूक केल्याप्रकरणी अजय सिंगवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यापूर्वी अमित अरोरा नावाच्या एका व्यावसायिकाने दावा केला होता की, अजय सिंगने त्यांना १० लाख शेअर्सची बनावट डिपॉझिटरी इंस्ट्रक्शन स्लिप (डीआयएस) दिली होती. अमित अरोरा म्हणाले की, अजय सिंग यांनी त्यांना एअरलाइन ताब्यात घेताना प्रदान केलेल्या सेवांच्या बदल्यात प्रवर्तकांकडून १०,००,००० शेअर्स हस्तांतरित करण्याचे आश्वासन दिले होते. व्यावसायिकाच्या तक्रारीनंतर गुरुग्राम पोलिसांनी स्पाईसजेटचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक अजय सिंग यांच्याविरुद्ध भारतीय दंड संहितेच्या कलम ४०६, ४०९, ४१५, ४१७ आणि ४२० अंतर्गत सुशांत लोक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.

व्यापारी अमित अरोरा यांनी त्यांच्या तक्रारीत म्हटले आहे की, स्पाइसजेटचे एमडी, अजय सिंग यांनी त्यांना डिपॉझिटरी इंस्ट्रक्शन स्लिप दिली होती, जी नंतर जुनी आणि अवैध ठरली असा आरोप केला आहे. त्यानंतर, जेव्हा मी त्यांना वैध डिपॉझिटरी इंस्ट्रक्शन स्लिप देण्यासाठी किंवा थेट शेअर्स हस्तांतरित करण्यासाठी त्यांच्याशी संपर्क साधला तेव्हा स्पाईसजेटच्या एमडीने थेट शेअर्स हस्तांतरित करण्यास नकार दिला.

हे मूर्खपणाचे आणि

खोटे प्रकरण : स्पाईसजेट

त्याच वेळी, या प्रकरणात, स्पाइसजेटच्या वतीने हे प्रकरण पूर्णपणे खोटे आणि मूर्खपणाचे असल्याचे म्हटले आहे. स्पाईसजेट कंपनी आणि तिचे एमडी अजय सिंग यांची प्रतिमा खराब करण्याच्या उद्देशाने दारू व्यावसायिक अमित अरोरा यांनी गुरुग्राम पोलिसात गुन्हा दाखल केला आहे.

काँग्रेसला मोठा धक्का! अरविंदर सिंग लवली यांचा दिल्लीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा; 'आप'सोबत युती केल्यामुळे नाराज

सरसंघचालक मोहन भागवत यांचे आरक्षणाच्या मुद्यावरून स्पष्टीकरण; "जोपर्यंत आरक्षणाची गरज..."

उज्ज्वल निकम यांना जळगावातून उमेदवारी द्यायला हवी होती - संजय राऊत

शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्याबद्दल जनतेच्या मनात सहानुभूती - छगन भुजबळ

Loksabha Election 2024 : भाजपने उत्तर मध्य मुंबईतून उज्ज्वल निकम यांना दिली उमेदवारी; पूनम महाजन यांची पहिली प्रतिक्रिया