राष्ट्रीय

Video : बिल्किस बानोच्या गावात 'दिवाळी'! न्यायालयाच्या निर्णयानंतर नातलगांनी केली फटाक्यांची आतिषबाजी

Rakesh Mali

बिल्किस बानो यांच्यावर सामूहिक बलात्कार करुन त्यांच्या कुटुंबातील सात जणांची हत्या करणाऱ्या 11 दोषींना माफी देण्याचा गुजरात सरकारचा निर्णय सर्वोच्च न्यायालयाने आज रद्द केला. या निर्णयावर देशभरातून प्रतिक्रिया येत असून अनेकांनी न्यायालयाच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. या निकालानंतर गुजरातमधील दाहोद जिल्ह्यातील देवगड-बारिया येथील बिल्किस बानो यांच्या घराबाहेर फटाके फोडून आनंद साजरा करण्यात आला. यावेळी बानो यांच्या काही नातेवाईकांनी 'आज न्याय मिळाला' अशी भावना व्यक्त केली.

बिल्किस बानो यांचे काही दूरचे नातेवाईक देवगड-बारिया येथे स्थायिक आहेत. सुप्रीम कोर्टाच्या निकालाची बातमी समजताच त्यांनी बिल्किसच्या घरासमोर फाटाक्यांची आतिषबाजी करीत या निर्णयाचे स्वागत केले. "आज न्याय मिळाला", अशी भावना गावातील नातेवाईकांनी व्यक्त केली.

"मी या खटल्यातील साक्षीदारांपैकी एक आहे. महाराष्ट्रातील न्यायालयाने 11 दोषींना शिक्षा सुनावली होती. गुजरात सरकारचा त्यांना सोडण्याचा निर्णय चुकीचा होता. त्यामुळे आम्ही त्याला न्यायालयात आव्हान दिले होते", असे देवगड-बारियाचे रहिवासी अब्दुल रझाक मन्सूरी यांनी सांगितले. "सुप्रीम कोर्टाने गुजरात सरकारचा निर्णय रद्द केला आणि दोषींना आत्मसमर्पण करण्यास सांगितले याचा मला आनंद आहे. मला वाटते की आज आम्हाला न्याय मिळाला आहे", असे ते म्हणाले.

काय आहे प्रकरण?

बिल्किस बानो सामूहिक बलात्कार प्रकरणातील ११ दोषींना जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली होती. मात्र, गेल्या वर्षी गुजरात सरकारने दोषींच्या शिक्षेत सूट देण्याचा निर्णय घेत दोषींची सुटका केली होती. दोषींच्या सुटकेनंतर सर्वोच्च न्यायालयात या निर्णयाला आव्हान देण्यात आले होते. न्यायमूर्ती बीव्ही नागरत्ना आणि न्यायमूर्ती उज्जल भुयन यांच्या खंडपीठासमोर १२ ऑक्टोबरला सुनावणी झाली होती. त्यानंतर निर्णय राखून ठेवण्यात आला होता. गुजरात सरकारने दोषींची शिक्षा माफ करण्याच्या निर्णयाला योग्य असल्याचे म्हटले होते. वेळेआधी दोषींची सुटका केल्याच्या निर्णयावर सर्वोच्च न्यायालयानेही प्रश्न उपस्थित केले होते. दोषी माफीयोग्य कसे बनले हे स्पष्ट करायला हवे असे सर्वोच्च न्यायालयाने विचारले होते.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस