PTI
राष्ट्रीय

‘एएमयू’च्या कर्मचाऱ्यांवर संकुलातच गोळीबार

अलिगड मुस्लीम विद्यापीठाच्या (एएमयू) दोन कर्मचाऱ्यांवर बुधवारी विद्यापीठाच्या संकुलातच दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी गोळीबार करण्याची घटना घडली आहे.

Swapnil S

अलिगड : अलिगड मुस्लीम विद्यापीठाच्या (एएमयू) दोन कर्मचाऱ्यांवर बुधवारी विद्यापीठाच्या संकुलातच दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी गोळीबार करण्याची घटना घडली आहे. या गोळीबारात जखमी झालेल्या दोन कर्मचाऱ्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून दोन्ही हल्लेखोर सध्या पोलीस कोठडीत आहेत.

गोळीबारात जखमी झालेल्या कर्मचाऱ्यांची नावे मोहम्मद नदीम आणि कलीम अशी आहेत. हे दोन कर्मचारी दुचाकीवरून जात असताना त्यांना दुचाकीवरूनच आलेल्या अन्य दोन जणांनी वाटेत अडविले आणि त्यांच्यावर जवळून गोळीबार केला. त्यामध्ये दोन कर्मचारी गंभीर जखमी झाले.

गोळीबाराचा आवाज ऐकताच संकुलातील सुरक्षा गस्ती पथकाने हल्लेखोरांचा पाठलाग केला आणि त्यांना पकडले आणि पोलिसांच्या स्वाधीन केले. पूर्ववैमनस्यातून हा हल्ला करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

Weather Update : राज्यात मुसळधारेचा इशारा; मुंबईत ऑरेंज अलर्ट

Mumbai : सार्वजनिक बांधकाम विभागात कर्मचाऱ्यांचे ठाण; विशिष्ट कर्मचाऱ्यांच्या बदल्याच होत नसल्याने आश्चर्य

अमेरिका-इराण युद्ध भडकले; ट्रम्प यांचे इराणी तळांवर हल्ल्यांचे आदेश, ५ व्या ताफ्यावर इराणचा प्रतिहल्ला

गुजरातच्या संस्थेला धर्मशाळा उभारण्याचे काम; ४९ वर्षांचा करार, एक रुपया नाममात्र दराने भाडेपट्टा, वैद्यकीय शिक्षण विभागाचा शासन निर्णय जारी

तुळजाभवानी देवस्थान इनाम जमीन गैरव्यवहाराची चौकशी; पुणे विभागीय आयुक्तांच्या अध्यक्षतेखाली समिती गठित