संग्रहित छायाचित्र  
राष्ट्रीय

प्रतिकूल हवामानामुळे फ्लाय ९१ च्या विमानाचे बंगळुरूमध्ये आपत्कालीन लँडिंग

हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या 'फ्लाय९१' एअरलाईन्सच्या विमानाला रविवारी खराब हवामानाचा मोठा फटका बसला. हुबळीमध्ये उतरणे शक्य नसल्याने हे विमान बंगळुरूच्या दिशेला वळवण्यात आले. या अनपेक्षित बदलामुळे आणि विमान बराच वेळ हवेत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते, मात्र सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

Swapnil S

बंगळुरू : हैदराबादहून हुबळीला जाणाऱ्या 'फ्लाय९१' एअरलाईन्सच्या विमानाला रविवारी खराब हवामानाचा मोठा फटका बसला. हुबळीमध्ये उतरणे शक्य नसल्याने हे विमान बंगळुरूच्या दिशेला वळवण्यात आले. या अनपेक्षित बदलामुळे आणि विमान बराच वेळ हवेत असल्याने प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण पसरले होते, मात्र सर्व प्रवासी सुखरूप असल्याचे विमानतळ अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

घटना काय

मिळालेल्या माहितीनुसार, हे विमान दुपारी ३ च्या सुमारास हैदराबादवरून रवाना झाले होते. नियोजित वेळेनुसार ९० मिनिटांत ते हुबळीला पोहोचणे अपेक्षित होते. मात्र, हुबळी परिसरात हवामान अत्यंत खराब असल्याने वैमानिकाला लँडिंगसाठी परवानगी मिळाली नाही.

प्रवाशांना रडू कोसळले

हवामान सुधारेल या आशेने वैमानिकाने सुमारे एक तास हुबळीच्या आकाशात विमानाने घिरट्या घातल्या. विमान साडेतीन तास हवेतच राहिल्याने विमानातील २२ प्रवाशांमध्ये घबराट पसरली. काही प्रवासी चक्क रडू लागले, तर काही जण सुरक्षिततेसाठी प्रार्थना करू लागले. अखेर सुरक्षिततेचा उपाय म्हणून विमान बंगळुरूकडे वळवण्यात आले.

संध्याकाळी ६:३० च्या सुमारास विमान बंगळुरूमध्ये सुखरूप उतरले. त्यानंतर रात्री ११ वाजता हवामान सुधारल्यावर विमानाने पुन्हा हुबळीसाठी उड्डाण केले.

इतर विमानांनाही फटका

केवळ हुबळीच नव्हे, तर या भागातील इतर विमानसेवेलाही हवामानाचा फटका बसला. मुंबई-कोल्हापूर विमानदेखील हवामानाअभावी गोव्याच्या दिशेने वळवावे लागले, अशी माहिती अधिकाऱ्यांनी दिली. सध्या हुबळी विमानतळावरील व्यवहार सुरळीत असून सर्व प्रवाशांनी सुटकेचा निःश्वास सोडला आहे.

Mumbai : १४ फूट उंच झोपड्यांच्या कारवाईवरून विरोधक आक्रमक; काँग्रेस, ठाकरेंच्या शिष्टमंडळांनी घेतली आयुक्तांची भेट

Kolhapur : भरधाव Ertiga ची दुचाकीला जबर धडक; पती-पत्नी थेट हवेत; एकजण जागीच ठार, अंगावर काटा आणणारा Video व्हायरल

समुद्रातील तरंगता कचरा हटवण्यासाठी रोबोटिक बोटी; ३.६ कोटींच्या प्रकल्पाला BMC ची मंजुरी, गेट वे, बधवार पार्क येथील प्रयोग यशस्वी

मुंबई मेट्रो वनची व्यवस्थापन क्षेत्रात भरारी; एकात्मिक आयएमएस-आयएसएमएस प्रमाणपत्र मिळवणारी देशातील पहिली मेट्रो

Mira-Bhayandar : कृत्रिम तलावांतील मूर्तींवर जेसीबीने भराव; पालिका अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल